सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली सहकार धोरण मसुदा तयार करण्यासाठी समितीची स्थापना.

     


        माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू (Suresh Prabhu) यांच्या अध्यक्षतेखाली देशातील विविध भागातील 47 सदस्य असलेल्या राष्ट्रीयस्तरावरील समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये सहकार क्षेत्रातील तज्ञ, राष्ट्रीय/ राज्य/ जिल्हा आणि प्राथमिक सहकारी संस्थांचे प्रतिनिधी यांचा समावेश असणार आहे. तसेच राज्य, केंद्रशासित प्रदेशांच्या सहकारी संस्थांचे सचिव, निबंधक आणि केंद्रीय मंत्रालये-विभागांचे अधिकारी यांचा ही समावेश असणार आहे.

        सध्या अस्तित्वात असलेले राष्ट्रीय सहकार धोरण (Cooperative policy) हे 2002 मध्ये आखण्यात आले होते, सहकार क्षेत्राचा सर्वांगीण विकास व्हावा हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. नवीन राष्ट्रीय सहकार धोरण दस्तऐवज, नवीन सहकार मंत्रालयाला दिलेल्या निर्देशानुसार तयार केला जात असुन, यामध्ये 'सहकारातून समृद्धी'ची संकल्पना साकार करणे, देशातील सहकारी चळवळीला बळकटी देणे, तळागाळातील लोकांपर्यंत त्याचे लाभ पोहोचवणे यासह  सहकारावर आधारित आर्थिक विकास मॉडेलला चालना देणे तसेच त्या संस्थांना त्यांच्या क्षमतेची जाणीव करून देण्यासाठी एक योग्य धोरण आराखडा तयार करणे यांचा समावेश आहे. हे नवीन धोरण देशातील सहकार चळवळीला बळकटी देण्याच्या दृष्टीने निश्चितच मोठा पल्ला गाठेल.

        भारतात सुमारे 8.5 लाख सहकारी संस्था आहेत ज्यांची सभासद संख्या सुमारे 29 कोटी आहे, जी देशभर व्यापली आहे. या सहकारी संस्था अंतर्गत कृषी-प्रक्रिया, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय, गृहनिर्माण, विणकाम, पत, विपणन यासारख्या विविध उपक्रम चालवले जातात.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने