कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या बरोबर मिळुन मला राजकारणातून संपवायचा प्रयत्न केला परंतु...

 


अडीच वर्षात त्यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या बरोबर मिळुन मला राजकारणातून संपवायचा प्रयत्न केला, परंतु ते मला काही संपवु शकले नाहीत' असे वक्त्यव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केले. ते नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधत होते. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सध्या सुरु असलेलेया ED च्या कारवाई बाबत विचारले असता त्यांनी त्या संदर्भात कोणतेही भाष्य करणे टाळले तसेच उद्धव ठाकरे यांचे कालचे भाषण हे निराशेतून केलेलं भाषण होते असा टोला देखील त्यांनी ठाकरेंना लगावला त्यांच्या या वक्तव्याला शिवसेना (ठाकरे गट) कसे प्रती उत्तर देतात हे पाहणे आता महत्वाचे ठरेल.  

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने