सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत शिंदे गटाला दिलासा तर ठाकरेंना धक्का.


 

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा बाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असून ( SC hearing on Maharashtra political issue) आजच्या सुनावणी मध्ये शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला असून, ठाकरेंना धक्का बसला आहे. आज दिवसभर पार पडलेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कामकाजावर स्थगिती आणण्यास नकार दिला. यामुळे दोन्ही गटांनी केलेल्या दाव्यांवर निर्णय घेण्याचा निवडणूक आयोगाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे शिंदे गट आणि ठाकरें मध्ये पक्षचिन्ह मिळवण्यासाठी असलेली लडाई आता निवडणूक आयोगासमोर पोहोचली आहे.

आपणच खरी शिवसेना असल्याचा शिंदे गटाचा दावा असून, निवडणूक आयोगाला यासंबंधी निर्णय घेण्यापासून रोखलं जावं अशी मागणी ठाकरेंच्या वतीने  सर्वोच्च न्यायालयात  करण्यात आली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेची ही याचिका फेटाळून लावली. आणि निवडणूक आयोगाच्या कामकाजावर स्थगिती आणण्यास नकार दिला. 


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने