स्वतंत्र भारत पार्टीच्या सदस्य नोंदणी मोहिमेस पुण्यातुन सुरूवात.

 


        स्वतंत्र भारत पार्टी या राष्ट्रीय पक्ष्याची सदस्य नोंदणी मोहिम सुरू करण्यात आली असून स्वतंत्र भारत पार्टी राज्यातील व देशातील सर्व निवडणुका लढविणार असल्याची माहिती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, अनिल घनवट यांनी पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 

        या प्रसंगी अ‍ॅड. महेश गजेंद्रगडकर यांची स्व. भा. पार्टीच्या  पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती  करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. स्वतंत्र भारत पार्टी एक राष्ट्रीय पार्टी असून किमान सात राज्यांमध्ये पार्टीचे काम सुरू आहे. ही पार्टी स्वतंत्रतावादी विचारांचा पुरस्कार करते व देशात किमान सरकार असावे तसेच सरकारने संरक्षण, कायदा व सुव्यस्था राखण्या पलीकडे इतर उद्योग, व्यापारात हस्तक्षेप करू नये. असे या पक्षाचे धोरण असेल.

         स्वतंत्र भारत पार्टीला, चक्रवर्ती राजगोपालाचारी (राजाजी) यांच्या स्वतंत्र पार्टीचा व शरद जोशी यांच्या स्वतंत्र भारत पक्षाचा राजकीय वारसा लाभला आहे खुले आर्थिक धोरणच देशातील बेकारी, गरिबी, भ्रष्टाचार, राजकारणातील गुन्हेगारी व देशाच्या कर्जबाजारीपणावरील उपाय आहे. काँग्रेस व भाजपा ने देशात सुरू ठेवलेल्या समाजवादी व्यवस्था या हे सर्व समस्यांचे मूळ आहे असे पार्टीचे मत आहे.

       यापुढे देशात  होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये स्व भा पार्टीचे सदस्य उमेदवारी करतील. दि. १५ सप्टेंबर २०२२ रोजी पुणे येथे पार्टीच्या सदस्य नोंदणीचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती महेश गजेंद्रगडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुणे येथील पत्रकार भवनामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत अनिल घनवट यांच्यासह स्व भा पा चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, मधुसूदन हरणे,अ‍ॅड.महेश गजेंद्रगडकर, सीमा नरोडे, अमित सिंग, सतीश दाणी आदी पार्टीचे नेते उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने