सांगलीत साधूंना मारहाण, दोषींवर कठोर कारवाई करा हिंदु जनजागृती समितीची मागणी.

 


        सांगली जिल्ह्यातील लवंगा गावात मथुरा (उत्तर प्रदेश) येथून बोलरो गाडीतून आलेले जुना आखाड्याचे चार साधू पत्ता विचारत होते. तेव्हा ते लहान मुले पळवणारे आहेत, असा समज करून स्थानिक जमावाने त्यांना बेदम मारहाण करण्याचा प्रकार घडला, असे समजते. साधूसंतांची भूमी म्हणावणार्‍या महाराष्ट्रात साधूंना सतत होणार्‍या मारहाणीमुळे महाराष्ट्राची मान पुन्हा एकदा शरमेने खाली गेली आहे. इतर धर्मगुरूंविषयी असे कधी घडल्याचे ऐकिवात नाही. निरपराध हिंदू साधूंना मारहाण होणे, ही मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे, त्यामुळे सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. साधूंविषयी असे वारंवार घडत असेल, तर शासनाने यावर ठोस उपाययोजना काढायला हवी. 

        तसेच दोन वर्षांपूर्वी पालघर येथे हिंदू साधूंना झालेल्या भीषण मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची जखम भरत नाही, तोच पुन्हा सांगली येथील लवंगा गावात 4 हिंदू साधूंना स्थानिकांकडून बेदम मारहाण झाल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर वायरल झाला आहे. ही घटना संताप आणि चीड आणणारी आहे. या संदर्भात महाराष्ट्र शासनाने तात्काळ दखल घेऊन दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे  केली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने