आशिया चषकावर कोण नाव कोरणार ? थोड्याच वेळात श्रीलंका-पाकिस्तान यांच्यात रंगणार अंतिम सामना


ब्युरो टीम : आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात आज श्रीलंका-पाकिस्तान या दोन तगड्या संघांमध्ये लढत रंगणार आहे.  हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार असून सायंकाळी ७.३० वाजता या लढतीला सुरुवात होईल. आजच्या सामन्यात कोण सरस ठरणार तसेच ट्रॉफीवर कोण नाव कोरणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
यूएईमध्ये सुरू असलेली आशिया चषक स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना आज पाकिस्तान व श्रीलंका या दोन संघामध्ये होईल.  सुपर-४ फेरीतील अंतिम सामन्यात याच दोन संघांमध्ये सामना रंगला होता. यामध्ये श्रीलंकेने पाकिस्तानवर पाच गडी राखून विजय मिळवला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात कोण सरस ठरणार तसेच ट्रॉफीवर कोण नाव कोरणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
दरम्यान, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), पाथुम निसांका, चरिथ असलंका, दानुष्का गुनाथिलका, दासून शनाका (कर्णधार), भानुका राजपक्षे, चमिका करुणारत्ने, जेफ्री वँडरसे, माहीश तिक्षाणा, मथिशा पाथिराना, दिलशान मधुशंका ही श्रीलंका संघाची  संभाव्य प्लेइंग इलेव्हन असण्याची शक्यता आहे. तर, पाकिस्तान संघाच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनमध्ये मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, आसिफ अली, मोहम्मद नवाज, शादाब खान, नसीम शाह, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन यांचा समावेश असू शकतो.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने