ऑक्टोबर पासुन सर्व प्रकारची कर्जे महागणार ?

 


ऑगस्ट महिन्याच्या आकडेवारीत महागाईचा दर ७ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर डॉलरच्या तुलनेत रुपयाची सातत्याने घसरण होत आहे. 23 सप्टेंबर रोजी डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाला आणि 81 रुपयांच्या पुढे गेला. या परिस्थितींवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्याजदरात वाढ करू शकते. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने 13 सप्टेंबर रोजी किरकोळ चलनवाढीची आकडेवारी जाहीर केली होती, ज्यामध्ये देशाचा किरकोळ महागाई दर ऑगस्टमध्ये 7.0 टक्क्यांवर पोहोचला होता. तर, गेल्या महिन्यात जुलैमध्ये किरकोळ महागाई दर 6.71 टक्के कमी होता. महागाईचा दर वाढल्याने आरबीआय चिंतेत आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची (MPC) बैठक 30 सप्टेंबर रोजी होणार आहे. या बैठकीत महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी व्याजदरात 50 बेसिस पॉइंट्सने वाढ केली जाऊ शकते, असे विश्लेषकांचे मत आहे. रॉयटर्सने सर्वेक्षण नुसार तज्ञांचा असा विश्वास आहे की RBI 50 बेस पॉइंट्सच्या वाढीसह रेपो दर 5.90 टक्क्यांवर नेईल.

RBI ने व्याजदर वाढवल्यास सर्व सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील बँका कर्जाचे MCLR दर वाढवतील. यामुळे सर्व प्रकारच्या कर्जाचे व्याजदर वाढतील. याचा परिणाम म्हणून वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, गृहकर्ज यासह अन्य प्रकारच्या कर्जांवर जास्त व्याजदर द्यावा लागणार आहे. याशिवाय ईएमआयची रक्कमही वाढेल.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने