उच्च न्यायालयाच्या एका निकालाने आम आदमी पक्षाला झटका.

 


दिल्ली उच्च न्यायालयाच्या एका निकालाने आम आदमी पक्षाला मोठा झटका बसला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने 'आप'च्या नेत्यांविरोधात मोठा आदेश दिला आहे. न्यायालयाने आपल्या आदेशात आप नेत्यांना सोशल मीडियावरून नायब राज्यपालांविरोधातील सर्व पोस्ट, ट्विट काढून टाकण्यास सांगितले आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्याविरोधातील आक्षेपार्ह विधाने आणि वादग्रस्त पोस्ट काढून टाकण्याचे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने आम आदमी पक्षाच्या नेत्यांना दिले आहेत.

यासोबतच न्यायालयाने एलजीच्या बाजूने अंतरिम आदेश जारी केला आहे. तसेच दिल्लीचे एलजी विनय सक्सेना यांच्या विरोधात आपच्या नेत्यांना भविष्यात सोशल मीडियावर बदनामीकारक विधाने  नकरण्याचे निर्देश देखील दिल्ली उच्च न्यायालयाला दिले आहेत.अशी माहिती ANI या वृत्त संस्थने दिली आहे. याशिवाय लेफ्टनंट गव्हर्नर विनय कुमार सक्सेना यांनीही आम आदमी पक्षाच्या पाच नेत्यांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने