आज भारतीय नौदलासाठी दोन डायव्हिंग सपोर्ट व्हेसल्सचे जलावतरण.

 


हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड, विशाखापट्टणम द्वारे भारतीय नौदलासाठी दोन डायव्हिंग सपोर्ट व्हेसल्स (निस्टार आणि निपुन) आज 22 सप्टेंबर रोजी लॉन्च होणार आहेत. नौदल प्रमुख ऍडमिरल आर हरी कुमार हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील. नौसेना वेलनेस अँड वेलफेअर असोसिएशन (NWWA) च्या अध्यक्षा श्रीमती कला हरी कुमार यांच्या हस्ते या जहाजांचे जलावतरण केले जाईल. 

डायव्हिंग सपोर्ट वेसेल्स (DSVs) ही भारतीय नौदलासाठी HSL येथे स्वदेशी बनावटीची आणि बांधलेली जहाजे आहेत. जहाजे 118.4 मीटर लांब,  22.8 मीटर रुंद आहेत आणि त्यांचे वजन 9,350 टन असेल. ही जहाजे खोल समुद्रात डायव्हिंग ऑपरेशनसाठी तैनात केली जातील. आवश्यक असल्यास, DSV ही पाणबुडी बचाव कार्ये हाती घेण्यासाठी सक्षम आहे. शिवाय, ही जहाजे सतत गस्त घालण्यास, शोध आणि बचाव कार्ये करण्यास आणि उंच समुद्रात हेलिकॉप्टर ऑपरेशन्स करण्यास सक्षम असतील.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने