टीआरएस नेत्याला अमित शहांच्या ताफ्यासमोर आपली कार पार्क करणे महागात.

 


तेलंगणा राष्ट्रीय समितीच्या (टीआरएस) नेत्याला अमित शहांच्या ताफ्यासमोर आपली कार पार्क करणे महागात पडले आहे. टीआरएस नेते गोसुला श्रीनिवास यांनी ANI ला सांगितले की, त्यांची कार तेथे थांबली होती, त्यांनी तणावात असताना तेथे कार उभी केली होती आणि गृहमंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकाने कारची मागील काच तोडली. सोशल मीडियावर कारच्या तोडफोडीचे फोटोही समोर आले आहेत.

खरं तर, गृहमंत्री अमित शाह हैदराबाद मुक्ती दिनानिमित्त शहरात होते. कारमधील तोडफोडीच्या या घटनेनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना श्रीनिवास म्हणाले, "गाडी अशीच थांबली. मी तणावात होतो. गाडीच्या तोडफोडीबाबत मी पोलिस अधिकाऱ्यांशी बोलणार आहे."

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या ताफ्याच्या मार्गात गाडी का आली, गाडीत कोण होते, त्यांनी मुद्दाम गाडी थांबवली होती का, या प्रश्नांची उत्तरे सध्या पोलीस शोधत आहेत. सामान्यतः केंद्रीय मंत्री यांना उच्च सुरक्षा पुरविली जाते. केंद्रीय मंत्र्यांची सुरक्षेत सशस्त्र पोलीस दल (CAPF), CRPF आणि CISF चे युनिट्स तैनात असतात. सामान्य जनतेने त्यांच्या ताफ्यात अडथळा येऊ नये म्हणून पोलिस सुरुवातीपासून शेवटपर्यंत चोख कडेकोट सुरक्षा व्यवस्था करत असतात.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने