बुधवारी मुंबईमध्ये शिवसेनेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाचा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी शिंदे गटावर घणाघाती टीका केली. यावेळी सर्वांच लक्ष्य वेधले ते संजय राउत यांच्यासाठी मंचावर ठेवलेल्या रिकाम्या खुर्ची वर परंतु यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक सूचक ट्विट करत टीका केली आहे.
आज संजय राऊतांची खुर्ची रिकामी होती उद्या उद्या तुमची पण खुर्ची रिकामी ठेवावी लागेल तयारी ठेवा.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 21, 2022
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधाला आहे. संदीप देशपांडे यांनी ठाकरेंचे नाव न घेता ट्विट केले आहे. ‘आज संजय राऊतांची खुर्ची रिकामी होती उद्या तुमची पण खुर्ची रिकामी ठेवावी लागेल तयारी ठेवा.’
टिप्पणी पोस्ट करा