अदानी समूहाने अंबुजा सिमेंट्स लिमिटेड आणि एसीसी लिमिटेडचे अधिग्रहण केले.

 


अदानी समूहाने अंबुजा सिमेंट्स लिमिटेड (Ambuja Cement Ltd.) आणि एसीसी लिमिटेडचे (ACC Ltd.) स्विजरलँडच्या होल्सीम कडून यशस्वीरित्या अधिग्रहण केले आहे. होल्सीमच्या अंबुजा सिमेंट्स आणि एसीसी मध्ये असलेल्या स्टेकच्या खुल्या ऑफरचे मूल्य $6.5 अब्ज आहे, हे संपादन अदानीद्वारे सर्वात मोठे संपादन आहे, असे कंपनी द्वारे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

व्यवहारानंतर, अदानी अंबुजा सिमेंट्समध्ये 63.15% आणि ACC मध्ये 56.69% शेअर असतील. अंबुजा सिमेंट्सच्या बोर्डाने प्राधान्य वाटपाद्वारे अंबुजामध्ये 20,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मान्यता दिली आहे. अदानी समूहाच्या निवेदनानुसार, या करारात सेबीच्या नियमांनुसार दोन्ही संस्थांमध्ये ओपन ऑफरसह अंबुजा आणि एसीसीमधील होल्सीमचे स्टेक विकत घेणे समाविष्ट होते. अदानी समूहाने गेल्या वर्षी अदानी सिमेंट इंडस्ट्रीज या नावाने सिमेंट क्षेत्रात प्रवेश केला होता. या करारानंतर अदानी समूह भारतातील दुसरा सर्वात मोठा सिमेंट उत्पादक बनला आहे. होल्सीम कंपनीने 17 वर्षांपूर्वी भारतात व्यवसाय सुरू केला. ही जगातील सर्वात मोठी सिमेंट कंपनी मानली जाते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने