पाकिस्तान सरकारच्या ट्विटर अकाउंटवर भारतात बंदी.

 


पाकिस्तान सरकारचे ट्विटर अकाउंट भारतात बंद  (Twitter account of Pakistan government closed in India) करण्यात आले आहे. अलीकडेच सरकारच्या ट्विटर अकाउंटवरून पीएफआय बंदीच्या विरोधात ट्विट करण्यात आले होते. त्यामुळेच ही कारवाई झाल्याचे मानले जात आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या अतिरेकी इस्लामिक संघटनेवर गेल्या काही दिवसात कारवाई करण्यात आली होती. राष्ट्रीय तपास संस्थेसह (NIA) इतर संस्थांनी देशभरातील PFI च्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले होते.  

दिल्लीसह  इतर राज्यांमध्ये पीएफआयच्या तळांवर छापे टाकण्यात आले होते.  एनआयए आणि गुप्तचर संस्थांनी दिलेल्या इनपुट नुसार  पीएफआय हिंसक निदर्शनांसाठी योजना तयार करत होती. त्यानंतर हि कारवाई करण्यात आली होती. तपासा अंती पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेवर गृह मंत्रालयाने 5 वर्षांसाठी बंदी घातली होती (Popular Front of India (PFI) banned for 5 years). परंतु या विरुद्ध अलीकडेच पाकिस्तान सरकारच्या ट्विटर अकाउंटवरून पीएफआय बंदीच्या विरोधात ट्विट करण्यात आले होते. यामुळे हि कारवाई केली असल्याचे मानले जात आहे 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने