अभिनेत्री उर्मिला मातोंडकरआणि अभिनेता श्रेयश तळपदे दिसणार मराठी चित्रपटात एकत्र



ब्युरो टीम:  हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांवर छाप पाडणाऱ्या बॉलीवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर नेहमीच प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय असते. तिने तिच्या कारकिर्दीत बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक चित्रपटात काम केले आहे.मराठी चित्रपट सृष्टीतही माधुरी, आजोबा यासारख्या चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप पाडणारी उर्मिला मातोंडकर पुन्हा एकदा मराठी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

        अभिनेत्री उर्मिला परितोष पेंटर लिखित 'ती मी नव्हेच' या मराठी चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत श्रेयश तळपदे, निनिद कामत या कलाकारांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. हिंदी कलाविश्व गाजवणारे हे तिन्ही कलाकार मराठीत पहिल्यांदा 'ती मी नव्हेच' च्या निमित्ताने एकत्र काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. परंतु चित्रपट प्रदर्शनाची घोषणा करण्यात आलेली नाही. 

        आठ वर्षाच्या मोठ्या कालावधीनंतर उर्मिला मराठीत पुनरागमन करताना आपले मनोगत व्यक्त करताना म्हटली कि चित्रपटाची कथा एवढी सुंदर वाटली की एकटाच क्षणी ती मला भावल्याने मी पारितोषला नकार देऊ शकले नाही ‘ती मी नव्हेच’च्या माध्यमातून पारितोष सोबत काम करण्याचा आनंद तर आहेच शिवाय मराठी चित्रपटाद्वारे आणि श्रेयस तळपदे सारख्या सहकलाकारासोबत काम करायला मिळत असल्याने हा आनंद द्विगुणीत झाला आहे.”

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने