पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या कुनो राष्ट्रीय उद्यानात नामिबियातून आणलेले चित्ते सोडनार

 


पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उद्या 17 सप्टेंबर रोजी मध्य प्रदेशला भेट देणार ते येथील कुनो राष्ट्रीय उद्यानात(Kuno National Park ) नामिबियातून आणलेले चित्ते (cheetahs) सोडनार असुन हा कार्यक्रम सकाळी सुमारे 10:45 वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम म्हणजे भारतातील वन्यजीव आणि त्याच्या अधिवासाचे पुनरुज्जीवन तसेच वैविध्य जपण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. 1952 मध्ये भारतातून चित्ता नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आले होते. सोडण्यात येणारे चित्ते नामिबियातील असून त्यांना या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या सामंजस्य करारा अंतर्गत आणले आहे. भारतामध्ये हे चित्ते, प्रकल्प चित्ता अंतर्गत आणले आहेत. हा जगातील पहिला मोठा  वन्य मांसभक्षक प्राण्यांचा आंतरखंडीय  स्थानांतरण प्रकल्प आहे.

हे चित्ते भारतातील खुली जंगले आणि गवताळ प्रदेशातील परिसर सृष्टी पुनर्संचयित करण्यात मदत करतील. यामुळे जैवविविधतेचे संरक्षण करण्यात मदत होईल आणि जलसुरक्षा, कार्बन कमी करणे आणि मातीतील ओलावा संवर्धन यासारख्या परिसंस्थेच्या सेवा वाढवण्यास मदत होईल. परिणामी समाजाला मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. पर्यावरण संरक्षण आणि वन्यजीव संवर्धनासाठी पंतप्रधानांच्या वचनबद्धतेच्या अनुषंगाने हा प्रयत्न पर्यावरण-विकास आणि पर्यावरणीय पर्यटन उपक्रमांद्वारे स्थानिकासाठी उपजीविकेच्या संधी वाढवण्यास कारणीभूत ठरेल.

यानंतर १२.३० वाजता  करहाल, श्योपूर येथे आयोजित करण्यात येत असलेल्या बचत गटांच्या संमेलनात पंतप्रधान सहभागी होणार आहेत. दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियाना (डीएवाय-एनआरएलएम) अंतर्गत प्रोत्साहन दिले जाणार्‍या हजारो महिला बचत गट (एसएचजी) सदस्य/सामुदायिक संसाधन व्यक्ती या संमेलनात उपस्थित राहणार आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने