ॲपलने लॉन्च केला ‘आयफोन १४' हा सिम कार्ड नसलेला मोबाईल; जाणून घेऊयात या मोबाईलच्या फीचरविषयी......



        भारतासारख्या देशात नेटवर्क न मिळणे हे कॉमन झाले आहे, महत्वाच्या वेळी मोबाईलला नेटवर्क नसल्याचा अनुभव आपण अनेकदा घेतलाही असेल  यावर ॲपलने उपाय शोधला आहे . त्यांनी सिमकार्ड नसलेलया ‘आयफोन १४' ही मोबाईल सिरीज लॉन्च केली आहे . आयफोन १४ मध्ये उपग्रहीय संवाद(satellite communication) हे खास फिचर देण्यात आले आहे.  यामुळे  आपत्कालीन परिस्थितीत सेल्युलर नेटवर्क नसतानाही आपण आपल्या इच्छित व्यक्तीशी संपर्क साधण्याची सुविधा या फोने मध्ये देण्यात आलो आहे. 

आयफोन १४ हे नवीन फिचर कसे काम करते त्याची वैशिष्टये काय आहेत ते आपण पाहू 

 महत्वाच्या वेळी कुणाशी संपर्क साधत असताना अचानक मोबाईल नेटवर्क गेल्यास आपली मोठी गैरसोय होते. अशा या मोबाईल नेटवर्कच्या समस्येमुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेता नवनवीन तंत्रज्ञान समोर येऊ लागले आहे.  नुकत्याच लॉन्च करण्यात आलेल्या ‘आयफोन १४ सिरीज’मध्ये सॅटेलाईट कम्युनिकेशन हे खास फीचर देण्यात आले आहे. नेटवर्क नसल्याने आपल्याला मोबाईल वरून कुणाशी संपर्क साधता येत नाही. अशा वेळी थेट उपग्रहीय लहरींद्वारे आपण आपत्कालीन परिस्थिती संपर्क साधू शकतो असे फिचर असलेलया  ‘आयफोन १४’ मधील सँटेलाईट कम्युनिकेशन या फीचरच्या मदतीने आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधु शकतो. 

           ‘आयफोन १४’मध्ये नेटवर्क नसताना युजर्सना ''इमर्जन्सी टेक्स्ट व्हाया सॅटेलाईट'' हा पर्याय वापरता येतो. जेव्हा तुम्ही हे फीचर सुरू कराल, त्यावेळी तुमच्या आयफोनवर हे फीचर कसे वापरायचे, उत्तम सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी कशी मिळवायची याबाबत माहिती देण्यासाठी एक विंडो सुरू होते. त्याच्या मदतीने सॅटेलाईट कम्युनिकेशन हे फीचर वापरता येते. त्यानुसार फाइंड माय ॲपच्या मदतीने युजर आपत्कालीन परिस्थितीत सेवा बजावणाऱ्या प्रदात्यांशी संपर्क साधू शकतात. यामध्ये लोअर अर्थ ऑर्बिटमधील (एलईओ) उपग्रहाशी आयफोन कनेक्ट केला जातो. सामान्यतः हे उपग्रह पृथ्वीपासून जवळपास ६५० ते १६०० किमी अंतरावर असतात. या उपग्रहांच्या मदतीने कुठलाही अडथळा नसताना मेसेज पाठवण्यास किमान १५ सेकंद लागतात. डोंगरदऱ्या, दाट झाडी असल्यास साधारण १ मिनिट लागतो.

भारतात कधी मिळणार सेवा?

       ‘आयफोन १४' हा मोबाईल फोन भारतात वापरण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे कारण भारतात सॅटेलाईट फोने वापरास बंदी आहे. थराया किंवा इरिडियम सॅटेलाईट फोन वापरण्यास इंडियन वायरलेस ॲक्ट आणि इंडियन टेलिग्राफ ॲक्ट अंतर्गत ही बंदी करण्यात आली आहे

सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी हे फीचर सध्या ‘आयफोन १४ सिरीज’मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. शिवाय सुरुवातीला नोव्हेंबर महिन्यात आयओएस १६ चे नवे अपडेट आल्यावर अमेरिका आणि कॅनडा या दोन देशांमध्ये ही सेवा मिळणार आहे. 

सॅटेलाईट कम्युनिकेशनसाठी ‘ग्लोबलस्टार’शी करार

     ॲपलने  ग्लोबलस्टार या तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीशी सॅटेलाईट कम्युनिकेशन या फीचरसाठी  करार भागीदारी केली आहे. या करारामुळे ॲपलकडून  या फीचरसाठी ग्लोबलस्टारच्या ८५ टक्के नेटवर्कचा वापर केला जाणार आहे. दरम्यान, यापूर्वी गुगल आणि स्पेसएक्सनेही सँटेलाईट फीचर्सबाबत याबाबत घोषणा केली आहे. त्यातही गुगलकडून आगामी अँड्रॉइड १४ स्मार्टफोनमध्ये सॅटेलाईट कम्युनिकेशन या फीचरचा सवेश करण्यात येणार आहे.

गोपनीयतेचे काय?

        सॅटेलाईट कम्युनिकेशनद्वारे होणारा प्रत्येक संवाद हा एन्क्रिप्टेड स्वरूपात असेल. त्यामुळे त्यातून युजर्सच्या गोपनीयता, खासगीपणाला कुठलाही धोका पोचणार नाही, असे ॲपलकडून जाहीर करण्यात आले.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने