पुण्याला पालकमंत्री नियुक्त करा नाहीतर मला पालकमंत्री बनवा, पुण्यातील या नेत्याची मागणी.


ब्युरो टीम:  पुणे जिल्ह्यातील अनेक विकासकामे पुर्ण झाले आहे .आणि त्याचे उद्घाटन होणे बाकी आहे . शिंदे साहेब आपण आणि फडणवीस साहेब आपण काय झाडी,काय डोंगार,काय हाटेल यातुन बाहेर पडला असाल तर आपण पुणे जिल्ह्याला पालकमंत्री द्यावा अन्यथा माझी पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती करावी.मी आपणास आश्वस्त करू इच्छितो की पालकमंत्र्यांअभावी थांबलेला पुण्याचा विकास मी पुर्व पदावर आणेन.आणि पुढील काही महत्वाची कामे अगोदर पूर्ण करेन अशी मागणी भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष रविराज काळे यांनी केली.आहे. 

          पुणे जिल्ह्याचा सुमारे 825 कोटी रुपयांचा वार्षिक नियोजन आराखडा अंमलबजावणी अभावी सध्या स्थगित करण्यात आला आहे. राज्यातील आपण नव्या सरकारने या आराखड्याचे नियोजन पुन्हा करण्याचा निर्णय घेतला असून सध्या पुणे जिल्ह्याला पालकमंत्री नसल्याने त्याचे फेरनियोजन आणि कामांच्या मंजूऱ्या रखडल्या आहेत. विविध कामे नव्याने मंजूर होत असल्याने जिल्ह्यातील आमदार खासदार यांच्यामध्ये अस्वस्थता आहे नवीन पालकमंत्री मिळाल्याशिवाय जिल्हा वार्षिक नियोजनाचा आराखडा मंजूर करता येत नाही नवीन पालकमंत्री मिळेपर्यंत पुणे जिल्ह्याचा विकास देखील थांबला आहे.

            मुंबई येथील नेहरू तारांगणाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरामध्ये 11 कोटी रुपये खर्च करून तारांगण बांधण्यात आले आहे. आकाशगंगा, आकाशातील ग्रह, तारे,नक्षत्र, सूर्य, पृथ्वी यांच्या अभ्यासासाठी या तारांगणाचा उपयोग  विद्यार्थ्यांना होणार आहे. दोन महिन्यांपूर्वीच या तारांगणाचा उद्घाटन सोहळा आयोजित केला होता जून महिन्यामध्ये तत्कालीन पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार होते मात्र काही कारणास्तव हा दौरा रद्द झाला त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळून आपले म्हणजेच शिंदे गट आणि भाजपा हे सरकार अस्तित्वात आले आज घडीला अडीच महिने उलटूनही पुणे जिल्ह्याला पालकमंत्री नाही त्यामुळे तारांगणाचे उद्घाटन रखडले आहे आणि याचा फटका पिंपरी चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांना बसत आहे.



          पिंपरी चिंचवड शहरातील 15 चौकांमध्ये झाकलेल्या अवस्थेत शिल्प उभे आहेत पालकमंत्री नसल्यामुळे 15 चौकांमधील आणि विविध  उद्यानांमधील शिल्पांचे उद्घाटन देखील रखडले आहे.

        ही सर्व कामे तातडीने करण्यासाठी आपण माझी पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती करावी.आपण म्हणजेच शिंदे गट आणि भाजपा यांनी अधिकृत रित्या पुणे जिल्ह्याला पालकमंत्री दिल्यावर मी पुणे पालकमंत्री पदाचा राजीनामा देईल.आणि आपण इतर जिल्ह्यांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात पालकमंत्री हवे असल्यास भारतीय मराठा महासंघाचे सर्व जिल्हाध्यक्ष त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री होतील याची मी आपणास ग्वाही देतो.असे ही  जिल्हाध्यक्ष रविराज काळे म्हणाले. 



                


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने