या नदीच्या पाण्याला लोक स्पर्शही करत नाहीत, कारण...


        गंगा ही हिंदू धर्मातील सर्वात पवित्र नदी मानली जाते. याशिवाय सरस्वती, नर्मदा, यमुना इत्यादी नद्यांनाही मोठे महत्त्व आहे. कुंभमेळा असताना या नद्यांमध्ये स्नान करण्यासाठी संत महंतांची गर्दी असते. पण दुसरीकडे उत्तर प्रदेशात एक नदी ( river ) अशी आहे, जी आजही शापित म्हणून ओळखली जाते. या नदीच्या पाण्याला सुद्धा कोणी स्पर्श करीत नाही. नद्यांना भारतात खूप धार्मिक महत्त्व आहे. पण आपल्या याच देशात अशीही एक नदी आहे, जिच्या पाण्याला लोक हात लावणेही टाळतात. कर्मनाशा असे या नदीचे नाव असून ती उत्तर प्रदेशात  आहे.

        'कर्मनाशा' हा शब्द दोन शब्दांपासून बनलेला आहे. पहिला 'कर्म' आणि दुसरा म्हणजे 'नाशा'. असे मानले जाते की, कर्मनाशा नदीच्या पाण्याला स्पर्श केल्याने काम खराब होते, आणि चांगली कर्म मातीत मिसळतात. त्यामुळे लोक या नदीच्या पाण्याला हात लावत नाहीत. तसेच हे पाणी कोणत्याही कामासाठी वापरले जात नाहीत.

        कर्मनाशा नदी बिहार आणि उत्तर प्रदेशमधून वाहते. या नदीचा बहुतांश भाग उत्तर प्रदेशात येतो. उत्तर प्रदेशात ती सोनभद्र, चंदौली, वाराणसी आणि गाझीपूरमधून वाहते आणि बक्सर जवळ गंगा नदीला मिळते. या नदीच्या आजूबाजूला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हते, तेव्हा येथील लोक फळे खाऊन उदरनिर्वाह करत असत, पण या नदीचे पाणी वापरत नसत, असे सांगण्यात येते. 

        पौराणिक कथेनुसार, राजा हरिश्चंद्राचे वडील सत्यव्रत यांनी एकदा त्यांचे गुरू वशिष्ठ यांच्याकडे स्वतःच्या शरीरासह स्वर्गात जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण गुरूंनी त्यास नकार दिला. तेव्हा राजा सत्यव्रत यांनी गुरु विश्वामित्र यांना हीच विनंती केली. वसिष्ठ यांच्या सोबत वैर असल्यामुळे विश्वामित्राने सत्यव्रताला स्वर्गात पाठवले. हे पाहून इंद्रदेव क्रोधित झाले, आणि त्यांनी राजाचे डोके खाली करून त्याला पृथ्वीवर पुन्हा पाठवले. त्यानंतर विश्वामित्राने त्यांच्या दृढनिश्चयाने राजा सत्यव्रताला त्याच अवस्थेत स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यामध्ये थांबवले, आणि नंतर देवांशी युद्ध केले. या दरम्यान राजा सत्यव्रत आकाशात उलटे लटकत होते. त्याचवेळी  त्यांच्या तोंडातून लाळ पडू लागली. ही लाळ नदीच्या रूपात पृथ्वीवर आली. या नदीलाच कर्मनाशा नदी म्हणतात. गुरू वशिष्ठांनी राजा सत्यव्रत याला त्याच्या दुष्टपणामुळे शाप दिला. लाळेने नदी निर्माण झाल्यामुळे आणि राजाला दिलेल्या शापामुळे ती शापित मानली जाते, व आजही कर्मनाशा नदीच्या पाण्याला स्पर्श न करण्याची परंपरा पाळली जात आहे.

स्रोत: astrozoom.in यांच्या बरोबरच्या विशेष करारा अंतर्गत

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने