कसा होता वेदांता -फॉक्सकॉन कंपनीचा प्रवास, तो प्रकल्प गुजरात मध्ये का गेला ?

 


डिसेम्बर 2021 मध्ये वेदांता (Vedanta) कंपनीचे अनिल अग्रवाल यांनी सेमीकंडक्टर उद्योगात 60000 करोड रुपये गुंतवणूक करायचा निर्णय घेतला. त्यासाठी ते ग्लोबल पार्टनरच्या शोधात होते तसेच ते अशा एका राज्यात गुंतवणूक करणार होते जे राज्य अधिकची 10 - 15% इन्व्हेस्टमेंट करण्यास तयार होईल जी पायाभुत सुविधाच्या रूपाने असेल. महाराष्ट्र, हरियाणा, गुजरात, तामिळनाडू, तेलंगणा हे राज्य या स्पर्धेत असूनही वेदांताची महाराष्ट्राला प्रथम पसंती होती कारण अशा प्रकल्पांसाठी लागणारी 'महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स पॉलिसी 2016' जी 2016 मध्ये अस्तित्वात असलेल्या सरकारने बनवली होती आणि फक्त त्यावेळी महाराष्ट्र या राज्यातच अस्तित्वात होती, ज्यात प्रकल्पाला आवश्यक असलेले जमीन व इंसेंटिव्ह संबंधी धोरण तयार होते. 

या नंतर वेदांता कंपनीच्या टीम ने फेब्रुवारी 2022 मध्ये पुण्याजवळ तळेगाव येथे जमिनीचा सर्व्हे केला परंतु  डिसेंम्बर 2021 पासून फेब्रुवारी 2022 पर्यंत कंपनी आणि सरकार यांच्यात 'वाटाघाटी' काही केल्या संपल्या नाहीत याच महिन्यात फॉक्सकॉन (Foxcon) ने घोषणा केली कि फॉक्सकॉन व वेदांता (Foxcon & Vedanta) हे भारतात सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी संयुक्त उपक्रम स्थापन करणार आहेत ज्यात फॉक्सकॉन आपला 40% हिस्सा ठेवेल वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल हे या उपक्रमाचे अध्यक्ष असतील, या प्रकल्पाचा उद्देश स्थानिक इलेक्ट्रॉनिक्स उद्योगातील मोठ्या प्रमाणावर मागणी पूर्ण करणे हा राहील.

या आधी स्पर्धेत आघाडीवर असणारे राज्य कर्नाटक हे या स्पर्धेतून बाहेर गेले कारण या कंपनीला लागणारी जमीन व इतर इंसेंटीव्ह देण्यास त्यांनी असमर्थता दर्शवली. एका रिपोर्ट नुसार वेदांता आणि फॉक्सकॉन हे  1.55 लाख करोड रुपयाची गुंतवणुक करणार होते परंतु त्यासाठी ते कर्नाटक सरकारला प्रकल्पाच्या 35% म्हणजे जवळपास 35000 कोटी रुपये इन्सेन्टिव्हच्या स्वरूपात मागत होते त्यास कर्नाटक सरकारने नकार दिला व ते या स्पर्धेतून बाहेर पडले. 

 जुन  2022 पर्यंत रेसमध्ये तेलंगणा व तामिळनाडू हे राज्य देखील होते, त्यानंतर महाराष्ट्रात सरकार बदलले तोपर्यंत जुन्या सरकार बरोबर कंपनीचा कोणताही करार झाला नाही. काही कारणाने तेलंगणा व तामिळनाडू ही राज्य देखील स्पर्धेतून बाहेर पडले प्रकल्पाचे घोडे असे बरेच दिवस निर्णयाशिवाय  पडल्यानंतर. त्याच  महिन्यात फॉक्सकॉन चे अध्यक्ष यंग ली यांची नरेंद्र मोदी यांच्या बरोबर भेट झाली (Young Liu met with Prime Minister Narendra Modi) तारीख 23 जुन 2022 आणि कदाचित ह्या भेटीने व गुजरात सरकारच्या तत्परतेमुळे हा प्रकल्प गुजरात मध्ये गेला 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने