'प्रोजेक्ट चीता' हे श्रेय काँग्रेसचे, ट्विटमध्ये दावा


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज 17 सप्टेंबर 2022  मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात नामिबियातून आणलेले आठ चित्ते सोडण्यात आले. याबाबत काँग्रेसने काल एका ट्विटमध्ये म्हटले होते की, मनमोहन सिंग यांनी 2008-09 मध्ये 'प्रोजेक्ट चीता'च्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. हे श्रेय काँग्रेसचे आहे. 

काँग्रेसच्या ट्विटर हँडलने तत्कालीन वन आणि पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांचे छायाचित्र असलेले ट्विट केले होते, ज्यामध्ये 2008-09 मध्ये 'प्रोजेक्ट चीता' प्रस्तावित करण्यात आले होते. मनमोहन सिंग यांच्या सरकारने त्यास मान्यता दिली. ट्विटमध्ये पुढे लिहिले आहे की, 'एप्रिल 2010 मध्ये तत्कालीन वन आणि पर्यावरण मंत्री जयराम रमेश आफ्रिकेतील चीता आउट रीच सेंटरमध्ये गेले होते. 2013 मध्ये सुप्रीम कोर्टाने या प्रकल्पावर बंदी घातली, 2020 मध्ये कोर्टाने परवानगी दिली आली. त्यामुळे आता चित्ते येतील'.

जयराम रमेश यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत ट्विटमध्ये लिहिले की, 'पंतप्रधान क्वचितच प्रशासनातील सातत्य स्वीकारतात. चीता प्रकल्पासाठी 25.04.2010 रोजी माझी केपटाऊन भेट हे ताजे उदाहरण आहे. आज पंतप्रधानांनी विनाकारण तमाशा रचला. राष्ट्रीय प्रश्न दडपण्याचा आणि 'भारत जोडो यात्रे'वरून लक्ष हटवण्याचा हा प्रयत्न आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने