सरन्यायाधीश उदय लळीत यांचा मुंबई सत्कार. व्यासपीठावरील उपस्थिती वरून जयंत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा.


        सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश उदय लळीत(Chief Justice Uday Lalit) यांचा काल ११ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने हॉटेल ताज पॅलेसच्या क्रिस्टल हॉलमध्ये सत्कार करण्यात आला, यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात सध्या एक टक्केपेक्षा थोडी कमी तरतूद विधि व न्यायसाठी असून ती वाढवून एक टक्क्यांपर्यंत आणण्याचा देखील मानस व्यक्त केला तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीसाठी जास्तीची जागा देण्यासंदर्भात सकारात्मक असल्याचे व लवकरच त्याबाबतीत निर्णय घेतला जाईल हे सांगितले.

        आपल्या सत्काराला उत्तर देताना सरन्यायाधीश उदय लळीत यांनी त्यांच्या कारकिर्दीतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. मुंबईपासून करिअरची सुरुवात करून आज सरन्यायाधीश म्हणून मुंबईत आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत सत्कार स्वीकारताना मला कृतज्ञ वाटते आहे असे सांगून उदय लळीत म्हणाले की, वकील व्यवसायात सतत स्वतःला विकसित करणे व सुधारणा करीत राहणे हीच या व्यवसायाची खासियत आहे. सर्वोच्च न्यायालय ही माझी मातृसंस्था आणि कर्मभूमी आहे. माझ्या क्षमतेनुसार मी सर्वोच्च न्यायालयात काम केले आहे.

        परंतु या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व प्रदेशअध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत निशाणा साधला त्यांनी ट्विटरवर लिहले कि  "मा. सर्वोच्य न्यायालयाच्या घटनापीठासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारच्या वैधतेची गंभीर सुनावणी सुरु आहे, असे असताना मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्य न्यायालयाचे मा. सरन्यायाधीश यांच्यासोबत एका व्यासपीठावर बसणे, हे संकेतांना धरून नाही."


        

    या कार्यक्रमात न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते सरन्यायाधीश उदय लळीत यांचा सत्कार करण्यात आला तसेच संस्कृतमधील गौरव पत्र देण्यात आले. तर झुमा दत्ता यांच्या हस्ते अमिता उदय लळीत यांना मानचिन्ह देण्यात आले.या कार्यक्रमास केंद्रीय विधि व न्यायमंत्री किरेन रिजिजू, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, अभय ओक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, अमिता उदय लळीत, झुमा दत्ता, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांची उपस्थिती होती. मुंबई उच्च न्यायालयाचे इतर न्यायमूर्ती देखील उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने