Brahmastra:ब्रह्मास्त्र चित्रपटामुळे गुंतवणूकदारांचे 800 कोटीचे नुकसान, वाचा काय म्हणाले PVR चे CEO

 


        रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या प्रमुख भुमिका असलेल्या ब्रह्मास्त्र या चित्रपटाला नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्यानंतर त्याचा परिणाम आपल्याला  शेअर मार्केट मध्ये पाहायला गुंतवणूकदारांचे यात 800 कोटीचे नुकसान झाले. काहींना हा चित्रपट हॉलिवूडशी जुळणारा वाटला, तर काहींनी सांगितले की कहाणीमध्ये काही दम नाही अशा विविध नकारात्मक पुनरावलोकनां दरम्यान पीव्हीआर आणि आयनॉक्सच्या शेअर मध्ये गुंतवणुक असलेल्या गुंतवणूकदारांचे 800 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 

        परंतु ब्रह्मास्त्र या चित्रपटाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याच्या अफवांवर प्रतिक्रिया देताना, पीव्हीआरचे सीईओ कमल ग्यानचंदानी यांनी हे वृत्त निराधार आणि असत्य असल्याचे सांगत खंडन केले आहे. त्यांनी गेल्या तीन दिवसापासुन ट्विटच्या माध्यमातुन, सांगण्याच्या प्रयत्न केला आहे की पीव्हीआर थिएटर चेनने ब्रह्मास्त्र या चित्रपटा बरोबर अभूतपूर्व व्यवसाय केला आहे आणि त्याच्या रिलीजच्या पहिल्या दिवशी 8.18 कोटी रुपये कमवले आहेत.

        कमल ग्यानचंदानी यांनी ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची तुलना भूल भुलैया 2 (3.26 कोटी), आरआरआर (8.64 कोटी),KGF 2 (11.95 कोटी), गंगूबाई काठियावाडी (2.58 कोटी) आणि अक्षय कुमारचा सूर्यवंशी (5.08 कोटी). यासारख्या इतर चित्रपटांच्या कामगिरीशी केली. त्यांनी पुढे लिहले आहे  प्रेक्षकांचा प्रतिसाद सकारात्मक आहे आणि ते चित्रपटाचा आनंद घेत आहेत.  ते म्हणाले की PVR चा वीकेंड चांगला आहे आणि पुढील 3 महिन्यांतील चित्रपटांची मोठी लाइनअप पाहता हे उत्साहवर्धक आहे.




        रणबीर कपूर आणि आलिया भट्ट व्यतिरिक्त, ब्रह्मास्त्र मध्ये मौनी रॉय, अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि शाहरुख खान देखील वेगळ्या रूपात आहेत. हा चित्रपट 400 कोटी रुपयांपेक्षा जास्त बजेटमध्ये बनवला गेला आहे आणि भारतात 5,000 स्क्रीनवर आणि परदेशात 3,000 हून अधिक स्क्रीनवर रिलीज झाला होता.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने