हिंदू धर्माची भावना जगभर तेजस्वीपणे प्रवाहित करण्यात बीएपीएसचे (BAPS) योगदान: पीयूष गोयल

 


लॉस एंजेलिस येथील बीएपीएस स्वामीनारायण मंदिराला (BAPS Swaminarayan temple in Los Angeles) केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी भेट दिली. हिंदूंची एकजूट आणि हिंदू धर्माची भावना जगभर तेजस्वीपणे प्रवाहित करण्यात बीएपीएसचे योगदान अमूल्य असल्याचे गोयल यांनी यावेळी म्हटले. भेट दिल्यानंतर तेथील भारतीय समुदायाला संबोधित करत होते.

लॉस एंजेलिस येथील श्री स्वामीनारायण मंदिर संकुलाच्या परिसराची प्रशंसा करून आणि त्याच्या स्थापनेला दहा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन केले तसेच गोयल म्हणाले की, मंदिराची वास्तू ही या परिसरातील भारतीय आणि  लॉस एंजेलिसच्या क्षेत्राच्या विकास आणि प्रगतीसाठीच्या  भारतीयांचे योगदान यांचे द्योतक आहे. बीएपीएसचे  प्रमुख स्वामी महाराजांना त्यांच्या शंभराव्या  जयंतीनिमित्त आदरांजली वाहताना ते म्हणाले, की ज्यांनी महाराजांचे आशीर्वाद घेतले आहेत आणि त्यांच्याकडून शिकवण घेतली आहे, त्या जगभरातील आपल्या सर्वांसाठी हा एक अतिशय विशेष प्रसंग आहे‌.

गोयल पुढे म्हणाले की, जगभरातील श्रीस्वामीनारायण मंदिरांना भेट देण्याचे भाग्य त्यांना नेहमीच लाभले आहे आणि लॉस एंजेलिसमधील हे मंदिर अतिशय अनोखे आणि सुरेख असून त्याचे उत्तमरीत्या व्यवस्थापन करण्यात आले आहे. या मंदिराला भेट देताना अध्यात्माची जी अनुभूती येते ती अतिशय अनोखी असते, असेही त्यांनी नमूद केले.

भारतीय नागरिक भारताबाहेर पडतात आणि जीवनातील भौतिक सुखांचा अनुभव घेऊ लागतात, तेव्हा त्यांच्या पुढच्या पिढीचा मातृभूमीशी संपर्क कमी होतो. पण जिथे जिथे स्वामीनारायण मंदिर स्थापन झाले आहे तिथे पुढची पिढी मातृभूमीशी व अध्यात्म याच्याशी जोडलेली दिसते. त्यामुळे चांगल्या पध्दती आत्मसात केल्या जातात. म्हणूनच ही संस्था जगभरात मोठ्या प्रमाणावर समाजाची सेवा करत आहे, असेही गोयल यांनी यावेळी सांगितले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने