सीईपीएचा (CEPA) भारत- यूएई (UAE) व्यापारावर सकारात्मक परिणाम

 


भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात, एक मे 2022 रोजी, अस्तित्वात आलेल्या सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार (CEPA) मुळे, भारत-युएई यांच्या व्यापारावर सकारात्मक परिणाम झाला आहे. या करारानंतर,भारताची युएई इथे होणारी बिगर पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात जून ते ऑगस्ट 2022 या काळात, 5.92 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत ही निर्यात, 5.17 अब्ज डॉलर्स इतकी होती, म्हणजे ह्या निर्यातीत, 14 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. याच काळात म्हणजे  जून ते ऑगस्ट  2022 दरम्यान, भारताची, बिगर पेट्रोलियम उत्पादनांची  जागतिक निर्यात देखील वार्षिक आधारावर 3 टक्क्यांनी वाढली आहे. यानुसार, यूएई मध्ये भारतातून होणाऱ्या बिगर पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीत उर्वरित जगातील निर्यातीच्या तुलनेत, 5 पट वाढ झाल्याचे दिसते आहे.

पेट्रोलियम संबंधित आयात वगळता, याच तीन महिन्यांच्या कालावधीत यूएई मधून भारतात होणारी आयात 5.56 अब्ज डॉलर्स  (जून-ऑगस्ट 2021) वरून 5.61 अब्ज डॉलर्स (जून-ऑगस्ट 2022) पर्यंत वाढली आहे. तसेच टक्केवारीच्या दृष्टीने त्यात 1% वाढ झाली आहे.  युक्रेनमधील संघर्ष, चीनमध्ये कोविड 19 मुळे लागलेली टाळेबंदी, महागाईचा वाढता दबाव, प्रगत अर्थव्यवस्थांनी आपल्या आर्थिक धोरणात आणलेले अपेक्षित निर्बंध आणि त्यामुळे जागतिक व्यापारात झालेली घट (2021 च्या चौथ्या तिमाहीतील 5.7% विकासदराच्या तुलनेत 2022 च्या पहिल्या तिमाहीत 3.2% पर्यंत घट) यासारख्या जागतिक पातळीवरील महत्त्वाच्या स्थूल आर्थिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर  भारताची बिगर पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात 14% नी वाढली आहे. हि एक भारत देशासाठी चांगली घटना आहे.  

2022 या संपूर्ण वर्षांत, जागतिक व्यापाराचा विकासदर 3 टक्के राहील, असा अंदाज, जागतिक व्यापार संघटनेने एप्रिल 2022 मध्ये वर्तवला होता. मात्र, एप्रिल नंतर जागतिक घडामोडी अधिकच नकारात्मक झाल्यामुळे, हा अंदाज पुन्हा बदलला जाण्याची शक्यता आहे. मात्र, CEPA च्या वापरामुळे, येत्या काळात, भारतातील निर्यातीत अधिक वाढ होण्याची शक्यता असून, त्यासाठी भारतीय वाणिज्य विभाग,  यूएई मधील भारतीय दूतावासासह विशेष प्रयत्न करत आहे. यात, चालू आर्थिक वर्षांत,  व्यापार प्रोत्साहनासाठी यूएईमध्ये अनेक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने