संयुक्त सागरी बलांच्या (CMF) सरावात भारतीय नौदलाचा पहिल्यांदाच सहभाग.

 


ऑपरेशन सदर्न रेडीनेस ऑफ कम्बाईंड मेरिटाइम फोर्सेस (CMF) या वार्षिक प्रशिक्षण सरावात सहभागी होण्यासाठी आयएनएस सुनयना ही भारतीय युद्धनौका 24 सप्टेंबर 2022 रोजी पोर्ट व्हिक्टोरिया सेशेल्स येथे दाखल झाली. हिंद महासागर क्षेत्रातील सागरी सुरक्षेसाठी भारतीय नौदलाच्या वचनबद्धतेला बळकटी देण्याबरोबरच, भारतीय नौदलाची युद्धनौका पहिल्यांदाच संयुक्त सागरी बलांच्या (CMF) सरावात सहभाग होते आहे.

सीएमएफतर्फे आयोजित क्षमता उभारणीसंबंधी सरावांमध्ये सहयोगी भागीदार म्हणून ही युद्धनौका सहभागी होणार आहे. या संयुक्त सरावात अमेरीका, इटली, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि न्यूझीलंड या देशांची  शिष्टमंडळे तसेच यूके, स्पेन आणि भारताच्या नौका सहभागी होणार आहेत. आयएनएस सुनयनाच्या या बंदरावरील मुक्कामादरम्यान सहभागी राष्ट्रांशी व्यावसायिक संवादाचेही आयोजन करण्यात आले आहे.अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने  प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे 


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने