केंद्रीय मंत्रिमंडळाची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CST) रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाला मंजुरी.

 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुमारे 10,000 कोटी रुपयांची गुंतवणुक करून देशातील  3 प्रमुख रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्याच्या भारतीय रेल्वेच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस(सीएसएमटी), मुंबई सह नवी दिल्ली रेल्वे स्थानक व अहमदाबाद रेल्वे स्थानक यांचा समावेश आहे. 

सध्या 199 रेल्वे स्थानकांच्या विकासाचे काम सुरू आहे. यापैकी 47 रेल्वे स्थानकांसाठी निविदा जारी करण्यात आल्या आहेत. उर्वरित स्थानकांच्या बृहद नियोजन आणि रचनेचे काम सुरू आहे.32 स्थानकांचे काम वेगाने प्रगतीपथावर आहे. यातच आज नवी दिल्ली, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस(सीएसएमटी) आणि अहमदाबाद रेल्वे स्थानक या तीन मोठ्या स्थानकांसाठी 10,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. अशी माहिती रेल्वे मंत्रायलयाने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात दिली आहे.   

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने