डीआरआयने (DRI) अंदाजे 33.40 कोटी रुपये किमतीची, सोन्याची बिस्किटे केली जप्त.

 


डीआरआय  (DRI) अर्थात महसूल गुप्तचर संचालनालयाने सुमारे 65.46 किलो वजनाची  आणि अंदाजे 33.40 कोटी रुपये किमतीची, परदेशी सोन्याची 394 बिस्किटे जप्त केली आहेत. यांची ईशान्येकडून तस्करी होत होती. 

याबाबत प्रसिध्द केलेल्या माहितीनुसार मिझोराममधून विदेशी मूळ सोन्याची तस्करी करण्याचा आणि त्यासाठी देशांतर्गत कुरिअर पुरवठा साखळी आणि लॉजिस्टिक कंपनीचा  वापर करण्याची योजना एक टोळी आखत आहे, अशी खबर डीआरआयला मिळाली. तस्करी रोखण्यासाठी डीआरआयद्वारे ऑपरेशन गोल्ड रश ही मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत मुंबईला नेल्या जाणारा, विशिष्ट माल अडवण्यात आला. 19.09.2022 रोजी भिवंडी (महाराष्ट्र) येथे तपासणी केली असता सुमारे 19.93 किलो वजनाच्या आणि सुमारे 10.18 कोटी रुपये मूल्याच्या विदेशी मूळ सोन्याच्या बिस्किटांचे 120 नग जप्त करण्यात आले.

मालाची दुसरी खेप बिहारमध्ये अडवली गेली . लॉजिस्टिक कंपनीच्या गोदमामध्ये तपासणी केल्यावर, सुमारे 28.57 किलो वजनाची आणि सुमारे 14.50 कोटी रुपयांची, 172 विदेशी मूळ सोन्याची बिस्किटे सापडली. त्याचप्रमाणे, तिसऱ्यांदा लॉजिस्टिक कंपनीच्या दिल्ली हबमध्ये माल अडवण्यात  आला आणि त्याची तपासणी करण्यात आली. सुमारे 16.96 किलो वजनाचे आणि 8.69 कोटी रुपये किमतीचे विदेशी मूळ सोन्याच्या बिस्किटाचे 102 नग जप्त करण्यात आले. सुमारे 65.46 किलो वजनाचे आणि अंदाजे 33.40 कोटी रुपये किमतीचे एकूण 394 विदेशी मूळ सोन्याची बिस्किटे  या अनेक शहरांत राबवलेल्या मोहिमेत जप्त करण्यात आले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने