ई-कॉमर्स (E-Commerce jobs) क्षेत्रात अस्थायी कामगारांच्या मागणीत वाढ.

 


सणासुदीच्या हंगामासाठी ऑनलाईन डिलिव्हरी (online delivery) ऍप त्यांच्या ऑफरमध्ये सुधारणा करत आहेत आणि रात्री उशिरा डिलिव्हरी देण्यासाठी त्यांच्या सेवा वाढवत आहेत. उद्योग विश्लेषकांचे म्हणणे आहे की यामुळे अशा प्लॅटफॉर्म आणि लॉजिस्टिक कंपन्यांमध्ये अस्थायी कामगारांना कामावर घेण्याची स्पर्धा निर्माण झाली आहे. बऱ्याच अश्या ई-कॉमर्स (e commerce jobs) प्लॅटफॉर्मवर डिलिव्हरी कामगारांच्या वाढत्या मागणीमुळे त्यांना कंपन्यांकडून जास्त वेतन आणि सणासुदीच्या फायद्यांचे आमिष दिले जात आहे.

कोविड महामारीचा कमी झाल्यापासून या वर्षी सणासुदीच्या हंगामातील विक्री सर्वकालीन उच्चांकावर जाणार असल्याने, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म त्यांच्या अस्थायी  कामगारांना अधिक वेतन तसेच इतर सवलती देत ​​आहेत, ज्यामुळे अस्थायी कामगार या क्षेत्रात अधिक सामील होत आहेत. विशेषत: जुलैपासून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील नोकर्‍यांमध्ये 50-70 टक्के वाढ झाली आहे.ज्यात लास्ट-माईल डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह, पिकर, पॅकर, सॉर्टर, कस्टमर सपोर्ट आणि फील्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह सारख्या नोकऱ्यांचा समावेश आहे. येत्या काळात देखील अस्थायी कामगारांची जोरदार मागणी राहणार असुन, कमी वेळात आकर्षक कमाईची हि एक संधी आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने