रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) शुक्रवारी आपली पॉलिसी करणार आहे. विश्लेषकांच्या मते, यावेळीही रेपो दरात वाढ जवळपास निश्चित आहे. असे झाले तर या वर्षी सलग चौथ्यांदा रेपो दरात वाढ होऊ शकते. यामुळे गृहकर्ज घेणाऱ्यांच्या खिशावर पुन्हा एकदा बोजा वाढू शकतो. सेंट्रल बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या (RBI MPC meeting) या बैठकीत व्याजदर किती वाढतील याची उत्सुकता अनेकांना आहे.
मध्यवर्ती बँक शुक्रवारी रेपो दरात वाढ करेल, असा अंदाज बहुतांश तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. विश्लेषकांच्या मते, डॉलर मजबूत झाल्याने आणि महागाई पुन्हा एकदा वाढल्याने दर वाढणार आहे. रेपो दरात वाढ केल्यास कर्जदारांवर देखील परिणाम होईल. केंद्रीय बँक यावेळीही रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ करेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे रेपो दर ५.९० टक्क्यांवर पोहोचेल.
रेपो दरात कोणताही बदल केल्यास त्याचा परिणाम गृहकर्जाच्या व्याजदरावर होतो. रेपो दरात कोणतीही वाढ केल्यास तुमच्या कर्जाचा EMI वाढेल. मे 2022 पासून आतापर्यंत RBI ने रेपो रेट 1.40 टक्क्यांनी वाढवला आहे. मे 2022 मध्ये, मध्यवर्ती बँकेने महागाईचा सामना करण्यासाठी दर वाढवले होते. त्यानंतर जूनमध्ये आणि पुन्हा ऑगस्टमध्ये मध्यवर्ती बँकेने दर वाढवले आहेत.
टिप्पणी पोस्ट करा