अती व्यायाम (exercise) तुमचा घात करू शकतो.

 


सध्या जिममध्ये जाऊन वर्कआऊट करणार्‍यांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. व्यायाम केल्यामुळे शरीर सदृढ राहते. व्यायाम करणे शरीराच्या वाढीसाठी फायदेशीर असते. पण तुम्हाला माहिती आहे का, व्यायाम केल्यामुळे शरीराला फायदा (beneficial for the body) होत असला तरी, अति-व्यायामाची सवय (habit) धोकादायक ठरू शकते.  संशोधनात असे समोर आले आहे की, उच्च तीव्रतेचा व्यायाम (high intensity exercise) करणाऱ्या लोकांमध्ये अचानक हृदयविकाराचा झटका (sudden cardiac arrest) येतो. तर, काही लोकांमध्ये यामुळे ब्रेन हॅमरेज देखील होते. नुकताच मृत पावलेला कलाकार सिद्धार्थ शुक्ला सुद्धा रोज 3-4 तास वर्कआउट करायचा.

यूएस नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, अतिव्यायाम केल्याने अचानक कार्डिअ‍ॅक अरेस्ट (SCA) किंवा कार्डिअ‍ॅक डेथ (SCD) आणि ब्रेन हॅमरेजचा धोका वाढतो. या मृत्यूमागे अनेक कारणे आहेत. 'दीपेश भानचा' मृत्यू ब्रेन हॅमरेजमुळे झाला होता. त्याला कारण होते, झोपेतून उठल्यानंतर रिकाम्या पोटी क्रिकेट खेळायला सुरुवात करणे. खरतर ब्लड प्रेशर सहसा सकाळी कमी असते, आणि रिकाम्या पोटी शरीरातील साखरेचे प्रमाण देखील कमी होते. अशावेळी अचानक व्यायाम करणे किंवा कठीण खेळ खेळणे ब्रेन हॅमरेजचे कारण ठरते. तसेच जिममध्ये तासनतास व्यायाम केल्याने डिहायड्रेशन ची समस्या उद्भवते, आणि यामुळे हृदय काम करणे थांबवते. बॉलीवूड गायक केकेच्या मृत्यूचे कारण सुद्धा ऍक्सेस स्‍वेटिंग हे ठरले होते.

निरोगी राहण्यासाठी 45 मिनिटे ते 1 तासाचा व्यायाम पुरेसा आहे. जर तुम्ही जास्त वेळ व्यायाम करत असाल, तर तुम्ही तो तज्ज्ञांच्या देखरेखीखाली करावा. जेणेकरून त्यांच्याकडून वेळोवेळी तुमची पल्‍स रेट, हार्ट बीट आणि इतर आरोग्याशी संबंधित गोष्टींकडे लक्ष दिले जाईल. याशिवाय, मॅरेथॉन धावपटूंवर केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की, मॅरेथॉनची स्पर्धा पूर्ण केल्यानंतर जेव्हा धावपटूंच्या रक्ताचे नमुने घेतले गेले, तेव्हा त्यांच्यामध्ये हृदयाच्या नुकसानाशी संबंधित बायोमार्कर आढळले. सहसा, हे डॅमेज इंडिकेटर स्वतःहून कमी होतात, परंतु यामुळे तुमचे हृदय वारंवार शारीरिक ताण सहन करत राहते, आणि त्यामुळे धोका कायम असतो.

बर्‍याच जणांना व्यायाम करायची आवड असते. पण अनेकांना किती वेळ व्यायाम करणे योग्य असते, हे ठाऊक नसते. अशावेळी गरजेपेक्षा जास्त व्यायाम केला जातो. मात्र, कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त केल्यास अपाय होऊ शकतो, हे विसरू नये. निरोगी आरोग्यासाठी स्वत:चा योग्य वर्कआऊट प्लॅन तयार करणे फायद्याचे ठरू शकते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने