Govt Jobs: राज्यस्तरीय तसेच जिल्हा परिषद स्तरावरील पशुधन पर्यवेक्षकाची ११५९ पदे भरणार

 


        राज्यस्तरीय पशुधन पर्यवेक्षकाची २८६ रिक्त पदे आणि जिल्हा परिषद स्तरावरील पशुधन पर्यवेक्षकाची ८७३ अशी ११५९ पदे बाह्यस्रोताद्वारे भरण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आल्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

        तसेच राज्यातील शेतकरी / पशुपालकांकडील पशुधनाचा वर लम्पीच्या रोगाचा प्रादुर्भाव पाहता हा निर्णय तातडीने घेण्यात आला असुन  पशुसंवर्धन विभागाच्या नियंत्रणाखालील राज्यस्तरीय पशुधन पर्यवेक्षकाची २८६ रिक्त पदे आणि जिल्हा परिषद स्तरावरील पशुधन पर्यवेक्षकाची ८७३ अशी एकूण ११५९ पदे बाह्यस्रोताद्वारे भरण्यात यावीत. तसेच पशुधन विकास अधिकारी, गट - अ ची २९३ रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नियमित स्वरुपात भरेपर्यंत ११ महिन्यांच्या कालावधीसाठी भरवी व त्या कालावधीकरीता रु. ५० हजार प्रती माह मानधनावर देण्यात यावे, असे निर्देश आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देण्यात आले. या निर्णया मुळे सरकारी नोकरी करिता वाट पाहणाऱ्या विद्यार्थीयांना दिलासा मिळाला आहे. 


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने