ICC T20 विश्वचषक 2022 पूर्वी टीम इंडियाला झटका, बुमराह T20 विश्वचषकातून बाहेर.

 


ICC T20 विश्वचषक 2022 पूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे T20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, बुमराहला स्ट्रेस फ्रॅक्चर आहे. तो काही महिन्यांसाठी खेळापासून दूर राहू शकतो. बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, “बुमराह T20 विश्वचषक नक्कीच खेळणार नाही. त्यांची पाठदुखीची समस्या गंभीर आहे. फ्रॅक्चर आहे आणि तो सहा महिन्यांसाठी बाहेर राहू शकतो.” ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन T20 सामने खेळलेला जसप्रीत बुमराह दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी तिरुअनंतपुरमला संघासोबत गेला नव्हता.

गुडघ्याच्या शस्त्रक्रियेतून सावरलेल्या रवींद्र जडेजानंतर बुमराह हा दुसरा वरिष्ठ स्टार खेळाडू आहे जो T20 विश्वचषकासाठी दुखापतीमुळे खेळणार नाही. जसप्रीत बुमराहच्या पाठीच्या समस्येच्या बाबतीत, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (NCA) फिजिओ लवकरच निर्णय घेतील  BCCI ने 28 सप्टेंबर 2022 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्याच्या नाणेफेकीनंतर एक ट्विट केले. त्या ट्विटमध्ये लिहिले होते, 'जसप्रीत बुमराहने मंगळवारी भारताच्या सराव सत्रादरम्यान पाठदुखीची तक्रार केली. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्यांची तपासणी केली. तो पहिल्या  IND v SA  T20 आंतरराष्ट्रीय (ICCT20WC) मधून बाहेर पडला आहे.

आशिया कप 2022 मध्ये टीम इंडिया सुपर 4 मधून बाद झाली होती. पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह आशिया कपमध्ये खेळला नव्हता. यानंतर त्याची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 टी-20 मालिका आणि 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपसाठी निवड झाली होती. यापूर्वी तो जुलै 2022 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने