अन युवराज चार्ल्स III (Charles III) हे पुढील ब्रिटिश सम्राट झाले..

 


        राणी एलिझाबेथ II (Queen Elizabeth II) यांच्या निधनानंतर चार्ल्स III (Charles III) हे पुढील ब्रिटिश सम्राट होणार हे नक्की होते, याबात आज  शनिवारी सकाळी बकिंगहॅम पॅलेस (Buckingham Palace) जवळील शाही निवासस्थान सेंट जेम्स पॅलेस (St. James’s Palace) येथे आयोजित केलेल्या एका समारंभात त्यांच्या या नवीन भूमिकेची अधिकृत घोषणा करण्यात आली. परंपरागत व  इतर अनेक औपचारिकतांसह चार्ल्सला राजा म्हणून आज अधिकृत पुष्टी मिळाली. यातील महत्वाचा क्षण आला तेव्हा ब्रिटीश जीवनातील अनेक ज्येष्ठ सदस्यांनी एकजुटीने घोषणा केली, “देवा राजाला वाचव (God save the king).”

        राजा चार्ल्सने नंतर जनतेला संबोधित केले आणि आपल्या आईचा वारसा पुढे चालू ठेवण्याच्या वचनबद्धतेवर जोर दिला. तो म्हणाला  "माझ्या आईने आयुष्यभर प्रेम आणि निःस्वार्थ सेवेचे उदाहरण दिले, माझ्या आईचा कार्यकाळ कालावधी हा समर्पण आणि भक्तीमध्ये भारलेला होता. आज आपण शोक करत असतानाही, मला मिळालेल्या ह्या जीवनाबद्दल मी आभार मानतो. मला या महान वारशाची आणि सार्वभौमत्वाची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांची सखोल जाणीव आहे. ती जबाबदारी आता माझ्यावर आहे.”

        या समारंभात पहिल्यांदा राजाच्या प्रिव्ही कौन्सिलची (king’s Privy Council) बैठक झाली, यात सार्वजनिक जीवनात उच्च पदावर पोहोचलेल्या राजाच्या सल्लागारांचा एक गट समाविष्ट होता. बोरिस जॉन्सन, थेरेसा मे, डेव्हिड कॅमेरॉन, गॉर्डन ब्राउन, टोनी ब्लेअर आणि जॉन मेजर हे माजी पंतप्रधान तसेच विरोधी कामगार नेते केयर स्टारर प्रिव्ही कौन्सिलचा सद्यश म्हणून उपस्थित होते.  प्रिव्ही कौन्सिलमध्ये प्रिन्स विल्यम यांचाही समावेश आहे, जे आता राजगादीचे  वारस असतील आता त्यांना प्रिन्स ऑफ वेल्स (Prince of Wales) ही पदवी राजा कडुन देण्यात आली आहे. परिषदेत समाविष्ट असलेल्या चार्ल्सची पत्नी, कॅमिला, पंतप्रधान लिझ ट्रस, आणि ज्येष्ठ धार्मिक व्यक्ती या सर्वांनी समारंभात घोषणेवर स्वाक्षरी केली.

        नंतर, राजा चार्ल्स तिसरा त्याच्या प्रिव्ही कौन्सिलला भेटला, या बैठकीत विविध घोषणा करण्यात आल्या तसेच चार्ल्सने चर्च ऑफ स्कॉटलंडचे समर्थन करण्याची शपथही घेतली. कौन्सिलच्या बैठकीनंतर, सेंट जेम्स पॅलेस आणि गार्टर किंग ऑफ आर्म्समधील बाल्कनीतून एक घोषणा वाचण्यात आली आणि अधिकृतपणे राजा चार्ल्स III च्या कारकिर्दीची सुरु झाली 


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने