कशी तपासाल कर परताव्याची (Income Tax Return) स्थिती.

 


अर्थ मंत्रालयाने वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या प्रत्येक देशवासीयांना आयकर रिटर्न भरणे बंधनकारक केले असुन. आर्थिक वर्ष 2022-23 साठी ITR दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै ही होती. या तारखेपर्यंत 5.83 कोटींहून अधिक करदात्यांनी ITR भरला आहे. आता केंद्रीय कर मंडळ प्रत्यक्ष करदात्यांना कर परतावा जारी करत असुन 19 सप्टेंबर 2022 रोजी नवीन डेटा नुसार, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने सांगितले या वर्षी कर परताव्यात 83 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत 1.35 लाख कोटींहून अधिक कर परतावा जारी करण्यात आला आहे. कर परतावा मिळवणाऱ्या करदात्यांची संख्या २ कोटींच्या पुढे गेली आहे. कर परतावा प्राप्तकर्त्यांमध्ये वैयक्तिक करदाते आणि कॉर्पोरेट करदाते दोघांचाही समावेश आहे.

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने 8 सप्टेंबर 2022 रोजी जारी केलेल्या डेटामध्ये 1.19 लाख कोटी रुपयांचा कर परतावा दिल्याचे सांगितले होते. त्याआधी 3 सप्टेंबर रोजी 1.97 कोटी करदात्यांना 1.14 कोटी रुपयांचा कर परतावा जारी करण्यात आला होता. यामुळेच आतापर्यंत कर परतावा मिळालेल्या करदात्यांची संख्या २ कोटींहून अधिक झाली आहे.

जर तुमचा कर परतावा आला नाही तर खालील प्रमाणे त्याची स्थिती तपासु शकता. 

1. प्राप्तिकर विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

2. पॅन नंबर, आधार क्रमांक किंवा यूजर आयडी टाकल्यानंतर पासवर्ड टाकून लॉगिन करा.

3. ई-फाइल पर्यायांतर्गत, इन्कम टॅक्स रिटर्नवर जा आणि फाइल केलेले रिटर्न पहा हा पर्याय निवडा.

4. नवीनतम फाइल आयटीआर तपासा आणि तपशील पहा वर क्लिक करा.

5. यानंतर तुमची कर परतावा स्थिती दर्शविली जाईल.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने