भारत(India), बांगलादेश( Bangladesh) दोन्ही देशांच्या रेल्वे मंत्रालया दरम्यान करार.


        भारत(India) आणि बांगलादेश( Bangladesh) या दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण सहकार्याला अधिक चालना देण्यासाठी तसेच दोन्ही देशांच्या रेल्वे मंत्रालयांमधील परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी, भारत आणि बांगलादेश रेल्वे मंत्रालया दरम्यान दोन सामंजस्य करार तयार करण्यात आले (India, Bangladesh railway Sign 2 MoUs). सध्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (Bangladesh PM Sheikh Hasina)ह्या भारत भेटीवर असुन त्यांच्या  भारत भेटीदरम्यान 06 सप्टेंबर 2022 रोजी या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. 

        या करारात भारतीय रेल्वेच्या प्रशिक्षण संस्थेत बांगलादेशच्या रेल्वे कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण देणे याबाबतचा सामंजस्य करार करण्यात आला असुन. या सामंजस्य कराराचा उद्देश दोन्ही देशांमधील सहकार्याचा आराखडा तयार करणे आणि बांगलादेशच्या रेल्वे कर्मचार्‍यांना कार्यक्षेत्रीय भेटीसह  भारतीय रेल्वेच्या प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षणाची सुविधा देणे हा आहे. तसेच बांगलादेशमध्ये प्रशिक्षण सुविधा स्थापन करण्यात आणि त्याच्यात सुधारणा घडवण्यात मदत करणे आणि त्या ठिकाणी भेट देणे, यासह भारतीय रेल्वे अधिकारी आवश्यकतेनुसार बांगलादेशच्या रेल्वे मंत्रालयाच्या अधिका-यांशी देखील समन्वय साधतील.

        एफओआयएस (FOIS)आणि इतर आयटी(IT) ऍप्लिकेशन्स सारख्या माहिती तंत्रज्ञान  प्रणालीमधील सहयोगाबाबतचा सामंजस्य करार देखील करण्यात आला असून बांगलादेश रेल्वेची कार्यप्रणाली याचे डिजिटलायझेशन, मनुष्यबळ व्यवस्थापन (एचआर) आणि आर्थिक पायाभूत सुविधा  यासारख्या संगणकीकरणाच्या सर्व बाबींसाठी, भारत सरकारचे रेल्वे मंत्रालय, रेल्वे माहिती प्रणाली केंद्राच्या (सीआरआयएस) माध्यमातून बांगलादेश रेल्वेला माहिती तंत्रज्ञानातील उपाय उपलब्ध करेल.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने