Indian Railways: भारतीय रेल्वे सुसाट, गेल्या वर्षीच्या तुलनेत महसुलात तब्बल 38% ने वाढ.


         रेलवे मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारी नुसार ऑगस्ट 2022 महिनाअखेरीपर्यंत भारतीय रेल्वेने एकूण 95,486.58 कोटी रुपये महसूल मिळवला आहे. हा महसुल गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील महसुलाच्या तुलनेत  26271.29  कोटी म्हणजेच 38% नी जास्त आहे. रेल्वेला  या वर्षी आतापर्यंत प्रवासी वाहतूकीतून  रेल्वेला 25,276.54 कोटी रुपये एवढा महसूल मिळाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत मिळालेल्या प्रवासी वाहतूक महसुलापेक्षा ही रक्कम 13,574.44 कोटी रुपयांनी म्हणजेच 116 टक्क्यांनी जास्त आहे.

        गेल्या वर्षाच्या तुलनेत आरक्षित तसेच अनारक्षित या दोन्ही प्रकारात प्रवासी वाहतूक वाढली असुन, लांब अंतराच्या आरक्षित मेल एक्सप्रेस संदर्भात ही वाढ दिसुन येते जी त्याच अंतरावरील पॅसेंजर किंवा उपनगरी गाड्यांच्या तुलनेत जास्त आहे. कोच विषयक इतर महसूल हा 2437.42 कोटी रुपये मिळाला आहे जो   गेल्या वर्षीच्या याच कालखंडातील महसुलापेक्षा हा महसूल 811.82 कोटी रुपयांनी म्हणजेच 50 टक्क्यांनी वाढला आहे.

        माल वाहतुकीतून मिळणारा महसूल यावर्षी ऑगस्ट अखेरीपर्यंत 65,505.02 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत जमा झालेल्या महसुलाच्या तुलनेत त्यात 10,780.03 कोटी रुपयांनी म्हणजेच 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. धान्य, खते, सिमेंट, खनिज तेल , कंटेनर वाहतूक आणि इतर मालाच्या वाहतुकीने बरोबर कोळसा वाहतुकीचा या वाढीत महत्त्वाचा वाटा आहे.इतर प्रकारचा महसूल सुद्धा 2267.60 कोटी रुपये झाला आहे. म्हणजेच त्यात देखील मागील वर्षाच्या महसुलापेक्षा 1105 कोटी रुपये म्हणजेच 95% नी वाढ झाली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने