JNPA कडून 814 हेक्टर खारफुटीचे क्षेत्र महाराष्ट्र सरकारकडे सुपूर्त.


 

जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने (JNPA) महाराष्ट्रच्या, वन विभागाच्या मॅन्ग्रोव्ह सेलकडे 814 हेक्टर खारफुटीचे क्षेत्र हस्तांतरित केले. हे हस्तांतरण राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी आणि जेएनपीएचे उपाध्यक्ष उन्मेष शरद वाघ यांच्या उपस्थितीत पार पडले.

या प्रसंगी बोलताना जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी म्हणाले “आम्ही महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर (MRSAC) ने केलेल्या, भौगोलिक माहिती  प्रणाली (GIS) आधारित मॅनग्रोव्ह मॅपिंगनुसार पर्यावरण संवर्धनासाठी 814 हेक्टर खारफुटी क्षेत्र महाराष्ट्र सरकारकडे सुपूर्द करत आहोत. आम्ही नैसर्गिक घटकांचा आदर करतो तसेच वनस्पती आणि प्राण्यांच्या संवर्धनासाठी काम करतो. जेएनपीए शाश्वत विकासासाठी वचनबद्ध आहे आणि बंदर परिसरातील पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी विविध उपक्रम आणि उपाययोजना राबवते.”

जवाहरलाल नेहरू बंदराने  एक कृती आराखडा तयार केला आहे. त्यात बंदरातील माल  हाताळणी, साठवण, निर्वासन आणि पर्यावरण संरक्षणाशी संबंधित इतर  सर्व बाबींचा  समावेश आहे. बंदराने पर्यावरण व्यवस्थापन आणि देखरेख योजना (EMMP) देखील तयार आणि लागू केली आहे. काही ग्रीन पोर्ट उपक्रमांमध्ये हरित क्षेत्राचा अधिक  विस्तार, जवाहरलाल नेहरू बंदरात एलइडी दिवे वापरणे, ई-वाहनांचा वापर, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन इत्यादींचा समावेश त्यात आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने