ट्विटरवर का ट्रेंड होत आहे JusticeForAdityaTiwari

 


बिहारमधील एका घटनेने पुन्हा एकदा राजस्थानच्या कन्हैया लालच्या हत्येची आठवण करून दिली आहे. येथे काही विद्यार्थ्यांनी सुरवातीला सोशल मीडियावर 'खेला होई' पोस्ट टाकली आणि काही वेळातच आदित्य तिवारी नावाच्या 15 वर्षीय तरुणाची हत्या केली. हे सर्वजण एकाच शाळेचे विद्यार्थी होते. आदित्यने या तरुणांना कोचिंगबाहेर मुलीचा विनयभंग करण्यास मनाई केली होती, त्यानंतर संतापलेल्या या मुलांनी त्याची निर्घृण हत्या केली. यानंतर ट्विटरवर #JusticeForAdityaTiwari ट्रेंड करत असून आदित्यला न्याय मिळावा अशी मागणी केली जात आहे.

बिहारमधील छपरा जिल्ह्यातील जलालपूरचे हे प्रकरण आहे. खून करण्यापूर्वी एका विदयार्थ्याने त्याच्या फेसबुकवर पोस्ट केली आणि लिहिले, "आज जेल होईल, उद्या जामीन आणि यानंतर थोड्याच वेळात  नववीमध्ये शिकणाऱ्या आदित्य तिवारीची नामक विदयार्थ्यांची हत्या करण्यात आली. आदित्य कुमार हा  छपरा जिल्ह्यातील जलालपूर येथील हायस्कूलचा विद्यार्थी होता. तारिफ, शाहिद आणि अर्शद या विदयार्थ्यांच्या टोळक्याने त्याच्यावर चाकूने हल्ला केला  त्यात आदित्यने जीव गमवला.

एक दिवसापूर्वी आदित्य तिवारी आणि तैफ यांच्यात मुलीच्या विनयभंगावरून हाणामारी झाली होती, तैफ हा एका विद्यार्थिनीची छेड काढत होता त्याला आदित्यने विरोध केला होता आणि ती हाणामारी इतकी वाढली की दोन्ही विद्यार्थ्यांच्या मित्रांनीही आपापसात गर्दी केली होती. दुसऱ्या दिवशी आदित्य परीक्षा देण्यासाठी शाळेत गेला असता, तिथे आधीच घात घालून बसलेल्या आरोपींनी त्याला वाटेत घेरले आणि त्याच्यावर चाकूने वार केले. यातच त्याचा मृत्यु झाला. या घटनेने जलालपूर येथील ग्रामस्थ संतप्त झाले.  जलालपूर मुख्य चौकात या घटनेच्या विरोधात लोकांमध्ये संताप दिसून आला.

याप्रकरणी पोलिसांनी शाहिद आणि अर्शद नावाच्या दोन आरोपींना अटक केली आहे, तर तिसरा आरोपी फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्य सूत्रधार असलेल्या तिसऱ्या आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत असे समजते. ही घटना उघडकीस आल्यानंतर सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने