kilash mountain: कैलास पर्वतावर चढाई करणे का शक्य नाही.

 


        कैलास पर्वताला (kilash mountain) हिंदू धर्मात अनन्य साधारण असे महत्व आहे. हिंदु धर्मा मधील मान्यते नुसार कैलास पर्वत हे भगवान शंकराचे निवासस्थान आहे. या पर्वताबाबत अनेक अशा अश्यर्यकारक गोष्टी समोर आल्या असुन, त्यातील एक बाब म्हणजे जगातील सर्वात उंच असणाऱ्या माउंट एव्हरेस्ट पर्वत हा  आतापर्यंत ७ हजारपेक्षा अधिक लोकांनी सर केलं आहे, माउंट एव्हरेस्टच्या उंची 8849 इतकी आहे. तरी 6638 मीटर उंची असणारा कैलास पर्वत अजून कुणीही सर करू शकले नाही हे न उलगडणारे रहस्यच आहे.

         कैलाश पर्वत कुणीही सर करू न शकन्या बाबत अनेक कथा प्रचलित आहेत. बरेच लोक असे सांगतात की  कैलास पर्वतावर भगवान शंकर राहतात म्ह्णून या ठिकाणी कुणीही जिवंतपणे जाऊ शकत नाही. असेही  प्रचलित आहे की कैलास पर्वतावर चढाईला सुरवात केल्यानंतर थोड्यच वेळात चढाई करणारी व्यक्ती दिशाहीन होते. दिशा न समजणे म्हणजे मरणाला सामोरे जाण्यासारखेच आहे. या सर्व कारणांमुळे कैलाश पर्वतावर आज पर्यंत कुणीही यशस्वी  चढाई केली नाही . 

       माध्यमांच्या माहिती नुसार एका गिर्यारोहकांच्या आपल्या पुस्तकात कैलास पर्वताचे वर्णन करताना लिहिले आहे की माउंट एव्हरेस्टचा स्लोप 40-60 डिग्री आहे तर कैलाश पर्वताचा हाच स्लोप 65 डिग्रीपेक्षा जास्त आहे. यामुळे कमी उंची असूनही गिर्यारोहक कैलास पर्वतावर चढाई करू शकत नाहीत, तो पुढे लिहतो मी कैलास पर्वतावर चढाईचा प्रयत्न केला होता , परंतु या पर्वतावर शरीरावरील केस व नखे अत्यंत वेगाने वाढू लागतात  सोबतच कैलास पर्वत शिखरावर फार मोठ्या  रेडिओ अॅक्टिव्हीटी आहेत.

        सरगे सिस्टियाकोव (Sergey Sistiakov) या रशियन गिरायरीहाकाने सांगितलेत की, कैलास पर्वताच्या जवळ गेलो तेव्हा मी पर्वताच्या अगदी समोर उभा होतो अचानक माझं हृदय वेगाने धडधडत होतं,माझ्या शरीरात अचानकपणे कमजोरी जाणवायला लागली माझ्या मनात विचार आला कि इथे क्षणभरही थांबू नये. यानंतर मी जसजसा खाली उतरत गेलो तसतसं माझं मन हलकं होत गेलं. याच वेगवेगळ्या कारणामुळे आज पर्यन्त कैलास पर्वत शिखर कोणीही सर केल नाही . 

         चीनने स्पेनच्या एका टीमला कैलाश पर्वतावर चढाई करण्यास 18 वर्षापूर्वी म्हणजेच 2001 मध्ये परवानगी दिली होती, परंतु त्यांना अपयश आले. भारत आणि तिबेटसह जगभरातील लोकांचे मत आहे कि हे एक पवित्र ठिकाण आहे. त्यामुळे या कैलाश पर्वतावर कुणालाही चढाईस परवानगी देऊ नये. सध्या कैलास पर्वतावर चढाई करण्यास पूर्णपणे बंदी आहे. 

      1928 साली म्हणजेच 92 वर्षपूर्वी एका बौद्ध भिक्खु मिलारेपा हे या पर्वतावर चढाई करण्यास यशश्वी ठरले होते. ते कैलास पर्वतावरून जिवंत येणारे जगातील पहिले व्यक्ती आहेत.याचा अनेक ठिकाणी उल्लेख आढळतो

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने