प्रेमाचे (love) अनेक प्रकार आहेत, तुमचे प्रेम कोणत्या प्रकारात आहे हे जाणून घ्या.

 


प्रेम ही एक भावना आहे. प्रेमाचे वर्णन कोणीही शब्दात करू शकत नाही. प्रेम फक्त अनुभवता येते, प्रेम ही एक अतिशय खास आणि गुंतागुंतीची भावना आहे जी समजणे खूप कठीण आहे. प्रेम कुणावरही होऊ शकतं, प्रेमाचा अर्थ फक्त जोडपे नसुन, प्रेम हे मित्र, कुटुंब, भाऊ किंवा बहिणीवरही असू शकतं. आपण सर्वजण आपल्या आयुष्यात अनेक प्रकारे प्रेम अनुभवतो. परंतु  तुम्ही इतरांशी कोणत्या प्रकारचे नाते शेअर करत आहात किंवा तुम्ही कोणत्या प्रकारचे प्रेम करत आहात हे काही विशिष्ट गोष्टी द्वारे देखील तुम्हाला कळू शकते. आम्ही तुम्हाला त्याबद्दल सांगणार आहोत, जेणेकरून तुम्ही तुमचे नाते ओळखू शकाल. (Types of love)

आत्म प्रेम: प्रेमाचा अर्थ असा नाही की दोन व्यक्तींमध्ये प्रेम असते, प्रेम स्वतःवरही करता येते. काही लोक एकटे राहणे पसंत करतात. यालाच स्वप्रेम म्हणतात. यामध्ये ते स्वतःचे कौतुक स्वतः करतात, स्वतःला स्वीकारतात आणि स्वतःवर प्रेम करतात. स्व-प्रेम ही एक प्रक्रिया आहे जी स्वतःवर प्रेम करायला शिकवते. जे स्वतःवर प्रेम करतात. त्यांना जीवनात काय करायचे आहे हे स्वतःला चांगलेच ठाऊक असते. त्यांची जीवनशैली सुधारण्यासाठी ते पौष्टिक आहार, व्यायाम आणि पुरेशी झोप घेतात.

निस्वार्थ प्रेम: निस्वार्थ प्रेम म्हणजे कोणतीही आशा न ठेवता प्रेम देणे. जिथे तुम्ही तुमचे पूर्ण प्रेम कोणाला तरी कोणतही अपेक्षा न ठेवता देत असता. हे प्रेमाचे सर्वात शुद्ध स्वरूप आहे. असे प्रेमळ लोक दयाळू आणि समजूतदार असतात. निःस्वार्थ प्रेमाचे चांगले उदाहरण म्हणजे आपले आई बाबांचे घेता येईल. जे निस्वार्थीपणे आपल्या मुलावर खूप प्रेम करतात. निस्वार्थ प्रेम म्हणजे तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या निर्णयाचा आदर करता आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांचे समर्थन करता. याच बरोबर तुम्ही तुमचे नाते सुधारण्याचा प्रयत्न करत राहता.

वेडसर प्रेम: वेडसर प्रेमात तुम्ही तुमच्या मर्यादांकडे दुर्लक्ष करता. या प्रेमात तुम्ही तुमच्या पार्टनरशी इतके जोडले जाता की तुम्ही तुमच्या पार्टनरसाठी समस्या बनता. अशा परिस्थितीत, तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या प्रत्येक हालचाली आणि कृतीचा मागोवा घ्यायचा असतो. हे प्रेम कमी परिपक्वतेमुळे होते. यात तुम्हाला तुमच्या जोडीदारावर नियंत्रण ठेवायचे असते, याला वेडसर प्रेम म्हणतात.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने