Lumpy Skin Disease: शेतकऱ्यांनी लम्पी आजाराला घाबरू नये पशुधनाची योग्य ती काळजी घ्यावी.

 


ब्युरो टीम: लम्पी चर्मरोग (lumpy skin disease) नियंत्रणासाठी राज्यात पशुसंवर्धन विभागासह इतर यंत्रणा सज्ज झाली असुन. प्रत्येक जिल्ह्यात रोगाचे नियंत्रण करण्यासाठी औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. पशुधन पालक शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आपल्या पशुधनाची योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे. 

पशुसंवर्धन आयुक्त श्री.सिंह यांनी सांगितले, "लम्पी चर्मरोग हा केवळ गोवंश वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. हा आजार कीटककांपासून पसरतो. हा आजार मानवांना संक्रमित होत नाही. आतापर्यंत या रोगामुळे भारतात मोठ्या प्रमाणात जनावरे मृत्युमुखी पडली आहेत.परंतु  या आकडेवारीमुळे  पशुपालकांनी अनावश्यक भीती बाळगळण्याचे कारण नाही."

पशुपालकांना आवाहन करताना श्री. सिंह यांनी सांगितले की, लम्‍पी पशुंमध्ये वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी तो त्वरित उपचार सुरू केल्यास निश्चितपणे बरा होतो. याआजारामध्ये पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे पशुपालकांनी घाबरून जाऊ नये. तसेच मदतीसाठी पशुसंवर्धन विभागाचा टोल फ्री क्रमांक 1800-2330-418 अथवा राज्यातील कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्रमांक 1962 वर तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे .

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने