माझगांव डॉक (MDL) येथे रविवारी तारागिरीचे (Taragiri) होणार जलावतरण.

 

        माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) येथे येत्या रविवारी, 11 सप्टेंबर 2022 रोजी  युद्धनौका तारागिरीचे जलावतरण करण्यात येणार आहे. तारागिरीचे ही युद्धनौका एकात्मिक बांधणी पद्धत वापरून बांधण्यात आली आहे. प्रकल्प 17ए अंतर्गत तारागिरीची उभारणी 10 सप्टेंबर 2020 रोजी सुरु करण्यात आली होती व ऑगस्ट 2025 पर्यंत ती नौदलाकडे सुपूर्द होणे अपेक्षित आहे.  या युद्धनौकेचे  आरेखन  भारतीय नौदलाच्या अंतर्गत असलेल्या नौदल डिझाइन ब्युरो या आरेखन संस्थेने केले असुन युद्धनौका  पर्यवेक्षण पथकाच्या (मुंबई)  देखरेखीखाली एमडीएल  विस्तृत आरेखन  आणि बांधणी  करत आहे. 

        149.02 मीटर लांब आणि 17.8 मीटर रुंद असलेली ही युद्धनौका ,दोन गॅस टर्बाइन्स आणि 02 मुख्य डिझेल इंजिनांच्या संयोजनाद्वारे चालवली जात असून त्याचे आरेखन, जी सुमारे  6670 टन वजन असताना 28 नॉट्सपेक्षा जास्त वेग  प्राप्त करू शकते. युद्धनौकेच्या मुख्य भागाच्या बांधणीत वापरलेले पोलाद  हे आपल्या देशात विकसित केले असून ते भारतीय पोलाद प्राधिकरणाने  (SAIL) उत्पादित केलेले आहे. स्वदेशी बनावटीच्या या युद्धनौकेमध्ये  अत्याधुनिक शस्त्रे, सेन्सर्स, अत्याधुनिक कृती माहिती प्रणाली, एकात्मिक मंच व्यवस्थापन प्रणाली, जागतिक दर्जाची मॉड्युलर लिव्हिंग स्पेस, अत्याधुनिक वीज वितरण प्रणाली आणि इतर अनेक अत्याधुनिक वैशिष्ट्ये आहेत.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने