Navratri Culture : देवीचे तिसरे रूप म्हणजेच आई चंद्रघंटा देवी

 


आधी शक्तीला समर्पित शारदीय नवरात्र सुरु आहेत. आज नवरात्रीचा तिसरा दिवस असून. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवीचे  तिसरे रूप असलेल्या आई चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. आई चंद्रघंटा देवीचे रूप परम शांतीपूर्ण आणि परोपकारी आहे. आई चंद्रघंटा देवी तिच्या शांत आणि सौम्य स्वभावासाठी ओळखली जाते. देवीच्या गळ्यात पांढरी माळ असून देवीचे रूप वाघावर स्वार आहे. आई चंद्रघंटा देवीची आज  पूजा-अर्चा केल्याने आध्यात्मिक शक्ती प्राप्त होते, असे मानले जाते. 

धार्मिक शास्त्रानुसार नवरात्रीच्या तिसर्‍या दिवशी जो कोणी देवीच्या तिसर्‍या रूपाची म्हणजेच आई चंद्रघंटा देवीची विधीपूर्वक पूजा करतो, त्याला मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो. दूध आणि त्यापासून बनवलेल्या वस्तू चंद्रघंटा देवीला  अर्पण करा आणि दान करा.

माँ चंद्रघंटा मंत्राचा जाप करा 

या देवी सर्वभूतेषु मां चंद्रघंटा रूपेण संस्थिता।

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने