Navratri pooja : आपल्या जन्मतारखे प्रमाणे कशी कराल नवरात्रीत देवीची पूजा.


 

नवरात्र हा एक असा सण आहे जो वाईटशक्तीवर आणि चांगल्या शक्तीचा विजय साजरा करण्यासाठी साजरा केला जातो. नवरात्रीच्या सर्व नऊ दिवसांमध्ये भाविक देवीच्या नऊ रूपांची आराधना मोठ्या आनंदाने करतात. शिवाय, नवरात्र हा काळ नवग्रह उपाय करण्यासाठी देखील महत्त्वाचा काळ आहे. या वर्षीच्या नवरात्रीसाठी तुमच्या जन्मतारखे प्रमाणे काही सार्वत्रिक उपाय जाणून घेऊया.

क्रमांक 1 (जर तुमचा कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 तारखेला जन्मदिवस असेल) तर नवरात्रीमध्ये दररोज माँ दुर्गाला पिवळी केळी अर्पण करा. तसेच नवरात्रीमध्ये दुर्गा गायत्री मंत्राचा किमान 1000 वेळा जप करा.

क्रमांक 2 (जर तुमचा कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 आणि 29 तारखेला जन्मदिवस असेल) तर नवरात्रीमध्ये दररोज माँ दुर्गाला दुधापासून बनवलेली पांढरी मिठाई अर्पण करा. तसेच, त्या दिवसाच्या मंत्रासोबतच नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी माँ चंद्रघंटाच्या मंत्राचा जप करावा.

क्रमांक 3 (जर तुमचा कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 आणि 30 तारखेला जन्मदिवस असेल) तर नवरात्रीमध्ये दररोज माँ दुर्गाला नारळ अर्पण करा. तसेच, त्या दिवसाच्या मंत्राव्यतिरिक्त नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी माँ महागौरीच्या मंत्राचा जप करा.

क्रमांक 4 (जर तुमचा कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला जन्मदिवस असेल) तर नवरात्रीमध्ये दररोज माँ दुर्गाला पंचामृत अर्पण करा. तसेच, त्या दिवसाच्या मंत्राव्यतिरिक्त नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी माँ ब्रह्मचारिणीच्या मंत्राचा जप करा.

क्रमांक 5 (जर तुमचा कोणत्याही महिन्याच्या 5, 14 आणि 23 तारखेला जन्मदिवस असेल) तर नवरात्रीत प्रत्येक दिवशी माँ दुर्गाला गोड सुपारी अर्पण करा. तसेच, त्या दिवसाच्या मंत्राव्यतिरिक्त नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी मां कात्यायनी मंत्राचा जप करा.

क्रमांक 6 (जर तुमचा कोणत्याही महिन्याच्या 6, 15 आणि 24 तारखेला जन्मदिवस असेल) तर नवरात्रीत दररोज माँ दुर्गाला खीर अर्पण करा. तसेच, त्या दिवसाच्या मंत्राव्यतिरिक्त नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी माँ सिद्धिधात्रीच्या मंत्राचा जप करा.

क्रमांक 7 (जर तुमचा कोणत्याही महिन्याच्या 7, 16 आणि 25 तारखेला जन्मदिवस असेल) तर नवरात्रीमध्ये दररोज माँ दुर्गाला खवा अर्पण करा. तसेच, त्या दिवसाच्या मंत्राव्यतिरिक्त नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी माँ कुष्मांडाच्या मंत्राचा जप करा.

क्रमांक 8 (जर तुमचा कोणत्याही महिन्याच्या 8, 17 आणि 26 तारखेला जन्मदिवस असेल) तर नवरात्रीमध्ये दररोज माँ दुर्गाला गूळ अर्पण करा. तसेच, त्या दिवसाच्या मंत्राव्यतिरिक्त नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी माँ कालरात्रीच्या मंत्राचा जप करा.

क्रमांक 9 (जर तुमचा कोणत्याही महिन्याच्या 9, 18 आणि 27 तारखेला जन्मदिवस असेल) तर नवरात्रीमध्ये दररोज माँ दुर्गाला तूप अर्पण करा. तसेच, त्या दिवसाच्या मंत्राव्यतिरिक्त नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी माँ शैलपुत्रीच्या मंत्राचा जप करा.

तसेच नवरात्रीत दिवसातून दोनदा  ‘सिद्ध कुंजिका स्तोत्र’ चा पाठ करा. हा उपाय व्यक्तीला जीवनात इच्छित असलेल्या सर्व गोष्टींची पूर्तता करण्याचा आशीर्वाद मिळवून देईल. नवरात्रीच्या काळात माँ दुर्गाला रोज लाल फुले, तूप अर्पण करा आणि दिवसाप्रमाणे इतर नैवेद्य दाखवा.  या नऊ दिवसांत मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि जीवनाला नवे पंख देण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने जन्म क्रमांकानुसार उपाय केल्यास देवीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहील नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीची पूर्ण भक्तिभावाने पूजा करा.

सभार: पंडित कुलदीपजी कुलकर्णी 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने