Navratri Recipe: नवरात्री मध्ये बनवा बटाट्यापासुन झटपट उपवासाचे पदार्थ.

 


1. बटाट्याचे शंकरपाळे 

सामग्री : चार ते पाच बटाटे घ्या, एक छोटा चमचा पुदिन्याची पावडर, लाल मिरची गरजेप्रमाणे, कुट्टू पीठ - दोन छोटे चमचे,   सैंधव मीठ - चवीनुसार, तळण्यासाठी तेल/तुप 

कृती : सर्वप्रथम बटाटे सोला आणि मोठ-मोठ्या आकारात कापून घ्या. कापलेले बटाटे दोन ते तीन वेळा पाण्यातून स्वच्छ धुऊन घ्या. यानंतर एक ते दीड तास बटाटे थंड पाण्यामध्ये भिजत ठेवा, नंतर एका स्वच्छ कापडावर बटाटे पसरून ठेवा. काप तळताना ज्याप्रमाणे पीठ लावलं जातं, त्याप्रमाणे बटाट्याला हलक्या स्वरुपात कुट्टूचे पीठ लावा. आता गरम तेलामध्ये बटाटे फ्राय करून घ्या. बटाटे तळल्यानंतर वरून मीठ, लाल तिखट, पुदिन्याची पावडर मिक्स करावी.तयार आहे बटाट्याची तिखट खमंग शंकरपाळी.

2. उपवासाचा बटाट्याचा शिरा 

सामग्री :  ३-४ मध्यम आकाराचे बटाटे, साखर- १/४ कप, दोन चमचे तूप, फ्रेश क्रीम दोन चमचे, अर्धा चमचा वेलची पावडर 

कृती : सर्व प्रथम बटाटे उकडून घ्या आणि चांगल्या पद्धतीने बारीक करा किसुन घेतले तरी चालतील . त्यानंतर एका पॅनमध्ये तूप गरम करा आणि मॅश केलेले बटाटे तुपात परतून घ्या. मध्यम आचेवर बटाटे शिजवून घ्या. बटाटे शिजल्यानंतर त्यामध्ये साखर आणि क्रीम मिक्स करा. साखर पूर्णतः विरघळेपर्यंत सर्व सामग्री ढवळत राहा. शिरा तयार झाल्यानंतर वरून वेलची पावडर सोडावी.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने