राष्ट्रीय अत्यावश्यक औषधांची यादी (NLEM) 2022 जाहीर, 34 औषधांची भर.

 




         राष्ट्रीय अत्यावश्यक औषधांची यादी (NLEM) 2022  जाहीर करण्यात आली असुन, या यादीत आणखी 34 औषधांची भर पडली आहे आता यात 384 औषधांचा समावेश करण्यात आला आहे, तर मागील यादीतील 26 औषधे वगळण्यात आली आहेत. या यादीतील औषधांचे 27 उपचारात्मक श्रेणींमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे.

        "सर्वांना औषधे, स्वस्त औषधे या पंतप्रधान व भारत सरकारच्या धोरणाप्रमाणे  केंद्रीय आरोग्य मंत्रालय विविध पावले उचलत आहे. याचाच एक भाग म्हणुन सर्व स्तरांवर परवडणाऱ्या किंमतीतील दर्जेदार  औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी  अत्यावश्यक औषधांची राष्ट्रीय यादी (NLEM) महत्त्वाची भूमिका बजावेल. यामुळे किफायतशीर, दर्जेदार औषधांना चालना मिळेल व आरोग्य सेवेवर नागरिकांचा होणारा खर्च कमी होण्यास मदत होईल.'', असे मत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी यादी जाहीर करताना व्यक्त केले. ते पुढे म्हणाले "अत्यावश्यक औषधांची  राष्ट्रीय यादी  हा एक महत्वाचा दस्तऐवज असून सार्वजनिक आरोग्याचा  बदलता  प्राधान्यक्रम तसेच औषध उत्पादनातील  ज्ञानातील प्रगती लक्षात घेऊन त्यात नियमितपणे सुधारणा केली जाते." 

        या प्रसंगी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती प्रवीण पवार या देखील उपस्थित होत्या या वेळ मत व्यक्त करताना त्या म्हणल्या '' अत्यावश्यक औषधी हे आपल्या  शास्त्रज्ञांसाठी आणि समुदायासाठी एक मोठे आव्हान म्हणून उदयाला  येत आहे त्यामुळे आपल्याला प्रतिजैविक प्रतिरोधासंदर्भात  समाजात जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे", असे त्यांनी सांगितले.

        अत्यावश्यक औषधांची राष्ट्रीय यादी प्रथम 1996 मध्ये तयार करण्यात आली होती आणि  2003, 2011 आणि 2015 मध्ये या यादीत तीन वेळा सुधारणा करण्यात आली आहे. अत्यावश्यक औषधांची राष्ट्रीय यादी 2022 तुम्हला भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या संकेत स्थळावर पाहता येईल


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने