राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरण (NLP) जाहीर.

 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीमध्ये विज्ञान भवन येथे राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरण (NLP) चे उद्घाटन केले.   या प्रसंगी बोलताना पंतप्रधान म्हणाले की "राष्ट्रीय लॉजिस्टिक पॉलिसी सुरु होणे हे भारताचा विकसित देश बनण्याच्या  दृष्टीने  एक महत्वाचे पाऊल आहे. तसेच शेवटच्या टोकापर्यंत मालाचे जलद वितरण सुनिश्चित करण्यासाठी, वाहतुकीशी संबंधित आव्हाने संपवण्यासाठी, उत्पादकांचा वेळ आणि पैशाची बचत करण्यासाठी, कृषी मालाची नासधूस रोखण्यासाठी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत आणि त्या प्रयत्नांचा आविष्कार  म्हणजे आजचे राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरण आहे”.    

राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरणाची गरज यासाठी आहे कारण  इतर विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात लॉजिस्टिक खर्च जास्त असल्याने राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरणाची गरज भासू लागली. देशांतर्गत तसेच निर्यात बाजारपेठेत भारतीय मालाची स्पर्धात्मकता सुधारण्यासाठी भारतातील लॉजिस्टिक खर्च कमी करणे अत्यावश्यक आहे. भविष्यात कमी झालेल्या लॉजिस्टिक खर्चामुळे अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांच्या कार्यक्षमतेतील कपात सुधारेल,तसेच मूल्यवर्धन आणि विविध उपक्रमांना प्रोत्साहन मिळेल.

2014 पासून, सरकारने व्यवसाय सुलभीकरण आणि जीवनमान सुलभ करणे या दोन्ही गोष्टींमध्ये सुधारणा करण्यावर लक्षणीय भर दिला आहे. संपूर्ण लॉजिस्टिकच्या  विकासासाठी एक व्यापक आंतरविद्याशाखीय, आंतर विभागीय आणि बहु-अधिकारक्षेत्रीय आराखडा तयार करून अधिक खर्च आणि अकार्यक्षमतेच्या समस्यांचे निराकरण करण्याचा एक व्यापक प्रयत्न सरकारने केला आहे, या दिशेने राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरण हे आणखी एक महत्वपूर्ण पाऊल आहे. हे धोरण, भारतीय उत्पादनांची स्पर्धात्मकता सुधारण्याचा, जलद आर्थिक विकास साधण्याचा आणि रोजगाराच्या संधी वाढवण्याचा प्रयत्न आहे. याआधी घोषित झालेले पंतप्रधान गतिशक्ती - मल्टी-मोडल कनेक्टिव्हिटीसाठीचा राष्ट्रीय मास्टर प्लान, हे या दिशेने एक अग्रगण्य पाऊल असुन राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरण लाँच केल्याने पंतप्रधान गतिशक्तीला आणखी चालना आणि पूरकता प्राप्त होईल. 

या प्रसंगी  केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योदिरादित्य सिंधिया, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय बंदर, जहाज आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान तसेच केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश हे देखील उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने