पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेवर पुन्हा एकदा कारवाई.

 


पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या अतिरेकी इस्लामिक संघटनेवर पुन्हा एकदा कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेसह (NIA) इतर संस्थांनी देशभरातील PFI च्या अनेक ठिकाणांवर परत छापे टाकले आहेत.  प्राथमिक माहितीनुसार, तपास यंत्रणांनी अनेक पीएफआय सदस्यांना वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक केली आहे. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीच्या शाहीन बागसह 8 राज्यांमध्ये पीएफआयच्या तळांवर छापे टाकण्यात आले आहेत. तसेच आसाममध्ये आज पहाटे 5 वाजता राज्य पोलिसांनी पीएफआयच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले असुन कर्नाटकात देखील पोलिसांनी आज सकाळी एका जिल्ह्यातील पीएफआय अध्यक्ष आणि  सचिवाला अटक केली आहे.

एनआयए आणि गुप्तचर संस्थांनी इनपुट दिले होते की पीएफआय हिंसक निदर्शनांसाठी योजना तयार करत आहे. त्यानंतर या सर्व राज्यात पुन्हा एकदा कारवाई करण्यात आली आहे. तपास यंत्रणांनी आठ राज्यांमध्ये 200 हून अधिक ठिकाणी छापे टाकून एकूण 170 सदस्यांना अटक केली आहे. शाहीन बाग, जामियासह अनेक भागात छापे टाकून १२ जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये आसाममधून 7 सदस्य आणि 10 जणांना अटक करण्यात आली आहे. 

याआधी एनआयए आणि ईडीने देशातील १५ राज्यांमध्ये पीएफआयवर छापे टाकले होते. 22 सप्टेंबर रोजी केरळमधून अटक करण्यात आलेल्या पीएफआयच्या सदस्यांना कोची येथील विशेष न्यायालयाने 30 सप्टेंबरपर्यंत एनआयएच्या कोठडीत ठेवलं आहे. एनआयएने पीएफआय आणि त्यांच्या अटक केलेल्या नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. तसेच यावेळी मोबाईल, लॅपटॉपसह विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने