पितृ पक्ष (Pitru Paksha 2022) उद्यापासून सुरू, जाणून घ्या तर्पणचे महत्त्व आणि तिथी.

 

        आज गणेश विसर्जन पार पडल्यानंतर उद्या पासुन 16 दिवस चालणारा पितृ पक्ष 10 सप्टेंबरपासून सुरू होत आहे तो 25 सप्टेंबरपर्यंत चालेल.पितृ पक्ष हा आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्याचा काळ आहे. हिंदू तिथी प्रमाणे पितृ पक्ष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी समाप्त होतो. समाप्ती अमावस्याला सर्व पितृ अमावस्या म्हणतात. नंतर दुसऱ्या दिवसापासून नवरात्रीला सुरुवात होते.

        पितृ पक्ष (Pitru Paksha 2022) काळाचे आपल्या जीवनात महत्व असुन या काळात आपण पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध, तर्पण, पिंड दान, पूजा इत्यादी करतो. या दरम्यान, विशेषत: कावळ्यांना खायला दिले जाते कारण अशी श्रद्धा आहे कावळ्यांद्वारे ग्रहण केलेले अन्न हे आपल्या पूर्वजा पर्यंत पोहोचते व त्यांची कृपा आपल्यावर वर्षभर राहते . याशिवाय काहींचा असाही विश्वास आहे की पितृ पक्षाच्या काळात आपले पूर्वज कावळ्यांच्या रूपात पृथ्वीवर येतात, त्यामुळे या काळात चुकूनही त्यांचा अनादर होऊ नये आणि त्यांना नेहमी अन्नाचा पहिला भाग द्यावा. 

        पितृ पक्ष तर्पण (Pitru Paksha Tarpan) करताना सर्वप्रथम स्वच्छ पाणी, बसण्याची आसन, ताट, कच्चे दूध, गुलाबाची फुले, फुलांच्या माळा, कुशा, सुपारी, जव, काळे तीळ, जनेयू इत्यादी घ्या.त्यानंतर तर्पण पद्धतीसाठी पूर्वेकडे तोंड करून बसावे, मग आचमन करावे आचमनानंतर हात धुवून स्वतःवर पाणी शिंपडावे, नंतर गायत्री मंत्राने कुंडी बांधून तिलक लावावा. नंतर ताटात पाणी, कच्चे दूध, गुलाबाच्या पाकळ्या टाका, मग हातात तांदूळ घेऊन देवतांचे स्मरण करा. त्यानंतर श्राद्ध करताना अनामिकामध्ये कुशा गवताची अंगठी घालावी. नंतर सरळ हाताने तर्पण अर्पण करावे. गाईचे दूध, दही, तूप किंवा खीर पितरांना अग्नीत अर्पण करा. भोजन करण्यापूर्वी गाय, कुत्रे, कावळे यांना अन्न बाहेर काढावे. दक्षिणेकडे तोंड करून कुश, तीळ आणि पाणी घेऊन पितृतीर्थावरून संकल्प करून अन्नदान करावे. तर्पण केल्यानंतरच यजमानाला अन्न अर्पण करावे आणि भोजनानंतर दक्षिणा व इतर वस्तूंचे दान करावे आणि यजमानांचा आशीर्वाद घ्यावा.

पितृ पक्षा २०२२ च्या तिथी 1) पौर्णिमा श्राद्ध: 10 सप्टेंबर, 2)प्रतिपदा श्राद्ध: 10 सप्टेंबर, 3)द्वितीया श्राद्ध: 11 सप्टेंबर, 4)तृतीया श्राद्ध: 12 सप्टेंबर, 5)चतुर्थी श्राद्ध: 13 सप्टेंबर , 6)पंचमी श्राद्ध: 14 सप्टेंबर,  7)षष्ठी श्राद्ध: 15 सप्टेंबर, 8)सप्तमी श्राद्ध: 16 सप्टेंबर, 9)अष्टमी श्राद्ध: 18 सप्टेंबर, 10)नवमी श्राद्ध: 19 सप्टेंबर, 11)दशमी श्राद्ध: 20 सप्टेंबर, 12)एकादशी श्राद्ध: 21 सप्टेंबर,  13)द्वादशी श्राद्ध: 22 सप्टेंबर, 14)त्रयोदशी श्राद्ध: 23 सप्टेंबर,  15)चतुर्दशी श्राद्ध: 24 सप्टेंबर 16)अमावस्या श्राद्ध: 25 सप्टेंबर. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने