Pitru Paksha: पितृ पक्षातील एकादशी तिथीचे महत्त्व.

 


हिंदू धर्मात पितृ पक्षाला खूप महत्त्व आहे, पितृ पक्षातील एकादशी तिथी देखील खूप शुभ मानली जाते. पितृपक्षातील एकादशीचे व्रत आणि विधिवत पूजा केल्याने पितरांचा मोक्ष होतो आणि त्यांच्या आशीर्वादाने जीवनात सुख-समृद्धी टिकून राहते, अशी श्रद्धा आहे. पितृ पक्षातील एकादशीला इंदिरा एकादशी असे म्हणतात. यावर्षी 21 सप्टेंबर 2022 रोजी इंदिरा एकादशी व्रत पाळण्यात येणार आहे. चला तर मग जाणून घेऊया  इंदिरा एकादशीचे (pitru paksha indira ekadashi)  महत्त्व.

हिंदू पंचांगानुरास, अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथी मंगळवार, 20 सप्टेंबर 2022 रोजी रात्री 09:26 वाजता सुरू होईल आणि बुधवार, 21 सप्टेंबर 2022 रोजी रात्री 11:34 वाजता समाप्त होईल. उदयतिथीनुसार इंदिरा एकादशीचे व्रत 21 सप्टेंबरला ठेवण्यात येणार आहे.  शास्त्रानुसार असे मानले जाते की वर्षभरात येणाऱ्या 24 एकादशींपैकी फक्त एक इंदिरा एकादशी आहे ज्याचे पुण्य पितरांना समर्पित आहे. इंदिरा एकादशीचे व्रत करून भगवान विष्णूची विधिवत पूजा केल्याने आपल्या पूर्वजांना यमलोकातून मुक्ती मिळते, असे मानले जाते. ज्यामुळे पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनात सदैव सुख, शांती आणि समृद्धी राहते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने